Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; RBI ने रेपो रेटमध्ये केली कपात गृहकर्जदारांसाठी आनंदाची बातमी
बिजनेस

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा; RBI ने रेपो रेटमध्ये केली कपात गृहकर्जदारांसाठी आनंदाची बातमी

RBI announces repo rate cut bringing relief to home loan borrowers

RBI repo rate cut : आज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही गृह लोन किंवा वाहन लोन घेतले असेल तर तुम्हाला दिलासा मिळणार आहे. कारण आता RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता गृहकर्जाचा EMI कमी होणार असून RBI बँकेने रेपो रेट घटवला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात मोठी कपात केली आहे. याबाबत शुक्रवारी मोठी घोषणा करण्यात आली असून महागाई दर सातत्यानं कमी आणि आर्थिक विकास दरात चांगली वृद्धी होत असल्यामुळे आरबीआयने हे व्याजदर घटवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. या कपात करण्याच्या निर्णयामुळे आता गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेतलेल्या व्यक्तींच्या EMI मध्ये फरक जाणवून येईल. म्हणजे आता सर्वसाधारण नागरिकांच्या डोक्यावर असलेला EMI चा भार कमी होणार आहे.

हे ही वाचा : मोबाईलमध्ये संचार सारथी ऍप प्री इन्स्टॉलेशन आता अनिवार्य; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

कधी झाली घोषणा

शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने नवे पतधोरण जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्याची माहिती जाहीर केली. आता हा नवीन रेपो रेट 5.25 टक्क्यांच्या पातळीवर येऊन ठेपला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे सरकारी आणि खासगी बॅकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या दरात कपात करण्यात येणार आहे. जेणेकरून आता सर्वसाधारण लोकांचा गृहकर्ज  आणि वाहन कर्जाच्या मासिक हप्त्याची रक्कम घटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यंदा तीन वेळा रेपो रेट मध्ये बदल

यंदा 2025 मध्ये आतापर्यन्त 3 वेळा रेपो रेट मध्ये बदल करण्यात आले होते. यामुळे रेपो रेट 1 टक्क्याने खाली आला होता. आता यात आणखी काही पॉईंटची भर पडली असु ग्राहकांना आता दिलासा मिळाला आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts