Sanchar Saathi app mandatory : तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये संचार सारथी अँप चे नोटिफिकेशन काही दिवसांपासून सतत येत असतील. आता प्रत्येक मोबाईल मध्ये संचार सारथी ऍप्लिकेशन इन्स्टोल करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत दूरसंचार विभागाने DOT ने प्रेस रिलीज जाहीर केले आहे. या प्रेस रिलीजच्या माध्यमातून वापरकर्ते आणि मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहे.
दूर संचार विभागाने भारतात तयार होणाऱ्या आणि आयात होणाऱ्या मोबाईल फोन मध्ये संचार सारथी ऍप्लिकेशन अगोदरच इन्स्टॉल करणे बंधनकारक केले आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार संचार सारथी ऍप्लिकेशन हँडसेट सुरु करताना किंवा सेटअप करताना स्पष्टपणे दिसायला हवे. आणि हे ऍप्लिकेशन वापरण्यावर कोणतीही मर्यादा लागवण्यात येऊ नये. याशिवाय देशभरातील विक्री चॅनेलमध्ये पूर्वीपासूनच उपलब्ध असलेल्या मोबाईलसाठी आणि उत्पादक आयातदारांसाठी सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन सर्व मोबाइलमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे असे देखील सांगण्यात आले आहे.
DoT issues directions for the pre-installation of the Sanchar Saathi App on mobile handsets to verify their genuineness. The pre-installed App must be Visible, Functional, and enabled for users during the first setup. Manufacturers must ensure the App is easily accessible during… pic.twitter.com/qrddTZFVk9
— ANI (@ANI) December 2, 2025
मंत्रालयाने जारी केले निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने 28 नोव्हेंबर रोजी नागरिकांना बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे मोबाईल मिळू नये आणि दूरसंचार साधनांचा गैरवापर होत असेल तर सोप्या पद्धतीने तक्रार करता यावी यासाठी निर्देश दिले होते. या निर्देशांनुसार 90 दिवसांच्या आत उत्पादकांनी अंमलबजावणी करावी आणि 120 दिवसाच्या आत compliance report सादर करण्यास सांगितले होते.
हे ही वाचा : शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; निफ्टी सेन्सेक्सवर FPI आऊटफ्लो चा परिणाम; रुपया घसरला
संचार सारथी ऍप्लिकेशनचे फायदे
टेलिकॉम संसाधनांच्या सायबर फसवणुकीचा गैरवापर टाळण्यासाठी आणि सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी डॉट म्हणजेच दूरसंचार विभाग संचार सारथी हा उपक्रम राबवत आहे. या अप्लिकेशन आणि पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना मोबाईलचा IMEI नंबर वापरून खरी ओळख तपासण्यासाठी फायदा होईल. एवढेच नाही तर तुम्हाला आलेला संशयास्पद कॉल किंवा मेजेजेसची तक्रार देखील तुम्ही करू शकतात. हरवलेला मोबाईल देखील तुम्हाला या अप्लिकेशनच्या माध्य्मातून शोधता येईल.






