• Home
  • राजकारण
  • तळ कोकणात भाजपाच्या थैल्यांना शिंदे गटाकडून बॅगेने उत्तर; संजय राऊत
Top News

तळ कोकणात भाजपाच्या थैल्यांना शिंदे गटाकडून बॅगेने उत्तर; संजय राऊत

Eknath Shinde Malvan Tours

Malvan BJP Shinde Clash : राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषतः मालवण नगर परिषद तसचं नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप-प्रत्यारोपांची मालिका जोर धरताना दिसत आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील मित्रपक्षांनीच एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर पैशांचे वाटप केल्याचा आरोप केला असून एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर त्यांनी धाडही टाकली होती. त्याचबरोबर निलेश यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. त्यामुळे तळ कोकणातले वातावरण थंडीच्या दिवसांत १०० पार गेलं आहे.

त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालवणच्या दौऱ्यावर “पैशांच्या बॅगा” घेऊन आल्याचा दावा केला आहे. वैभव नाईक यांनी यासंदर्भात एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावरही मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केलाय. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे फायरब्रांड नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर म्हणत या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यामुळे हा विषय आता फक्त कोकण पुरता मर्यादित न राहता राज्याचा विषय झाला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत यांनी एक्सवर एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, शिंदे मालवणात आले. येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर ! या आधी नाशिकमध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.

मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर..

संजय राऊत यांनी एक्सवर एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, शिंदे मालवणात आले. येताना बॅगेतून काय आणले ? मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगेने उत्तर ! या आधी नाशिकमध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय

माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप

एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे-शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे-शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts