Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • बारामती पोटनिवडणूक संदर्भात सपकाळ यांची भेट, रोहित पवारांनी काँग्रेसकडे केली ‘ही’ मागणी
Top News

बारामती पोटनिवडणूक संदर्भात सपकाळ यांची भेट, रोहित पवारांनी काँग्रेसकडे केली ‘ही’ मागणी

Rohit Pawar demand to Congress

Rohit Pawar demand to Congress : बारामती पोटनिवडणूकीचा (Baramati By-election) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshavardhan Sapkal) यांची भेट घेतली ( Rohit meets Sapkal) आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यांची पत्रकार परिषद घेत काही अटी शर्तींवर अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी आपल्या सोशल मिडिया एक्स अकाउंटद्वारे या संदर्भातील माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीची आणि बारामतीतील समस्त जनतेची मनापासूनची इच्छा आहे.

हेही वाचा – का हो पवार साहेब… लेकीचं तोंडभर कौतुक, सूनेचं तोंडून नावही नाही!

अजितदादांचे काँग्रेस नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध

अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीचा बहुतांश काळ काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर काँग्रेसच्या सोबत राहून व्यतीत झाला आहे. या संपूर्ण काळात, त्यांनी काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध जपले आहेत. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

काँग्रेसने बारामतीतून आपली उमेदवारी मागे घ्यावी – रोहित

या पार्श्वभूमीवर, आम्ही मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची भेट घेतली; आणि अजितदादा, त्यांचे कार्य तसेच काँग्रेसशी असलेले त्यांचे संबंध या बाबींचा विचार करून, काँग्रेसने बारामतीतून आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली.

अशा सरकारविरुद्ध आपण लढा का देऊ नये? – सपकाळ

अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताप्रकरणी जर महाराष्ट्रात ‘एफ.आय.आर.’ दाखल केला जात नसेल, तर अशा सरकारविरुद्ध आपण लढा का देऊ नये? अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आम्ही त्यांचे विचार आणि त्यांच्या पक्षाचे धोरण यांचा आदर करतो.

सुनेत्राकाकी यांची निवड बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे – रोहित

मात्र, काँग्रेससह ज्या ज्या अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्या सर्वांना मी अशी विनंती करतो की, त्यांनी आपले अर्ज मागे घेऊन, सुनेत्राकाकी यांची निवड बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे; आणि मला खात्री आहे की, आपण सर्वजण माझ्या या विनंतीचा नक्कीच मान राखाल, असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts