FPI outflow impact on Nifty and Sensex : आज देशांतर्गत शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात झाली. आज रुपयातील घसरण आणि परकीय गुंतवणूक दारांच्या FPI निधी साततयाने बाहेर काढल्यामुळे दोन्ही बेंचमार्क निर्देशांक लाल निशान उघडल्याची माहिती मिळाली आहे.
आज निफ्टी 50 हा निर्देशांकावर 26,146.00 वर व्यवहारास सुरुवात केली. हा मागील सत्राच्या तुलनेत -29.75 अंकांनी कमी आहे. तर आज BSE सेन्सेक्स 85.523.17 वर उघडला असून यामध्ये -118.73 अंकांची म्हणजे -0.14 टक्क्यांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय निफ्टीचा नवीन उचांक 26,325.80 एवढा आहे.
स्तर टिकवण्यात निर्देशांक अपयशी
शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, आज रुपया कमकुवत असल्यामुळे आणि FPI सतत भांडवल बाहेर काढत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आहे. या सत्राच्या सुरुवातीला उचांक गाठल्याचे पाहायला मिळाले होते. तर हे स्तर टिकवण्यात निर्देशांक अपयशी ठरला होता.
हे ही वाचा : आयुष्मान भारत योजना! या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना १० लाखापर्यंत मोफत उपचार
रुपया घसरल्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडली
भारतीय बाजारपेठेवर GDP चा जाणवलेला प्रभाव आणि कमी नाममात्र GDP आकडेवारीचा परिणाम जाणवत आहे. याशिवाय रुपया घसरल्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडली आहे. तर देशांतर्गत बाजार देखील प्रचंड प्रमोटर सेलिंग, मोठा IPO पाईपलाईनमुळे सेकंडरी मार्केटमध्ये लिक्विडीटी कमी झाल्याने FPI चे सातत्याने बाहेर जाण्याने कचाट्यात अडकला असल्याचे बँकिंग आणि मार्केट तज्ज्ञ अजय बग्गा यांनी ANI सोबत बोलताना सांगितले.
एनरिच मनीचे CEO पोनमुदी काय म्हणाले
26300 च्या वर निर्णयक ब्रेक झाल्यास निफ्टी परत 26500 किंवा त्यापेक्षा पुढील लक्ष गाठू शकतो. सध्या निफ्टी 50 विक्रमी उंचाकावर एकत्र आला असून प्रबळ तेजी नंतर नैसर्गिक स्थिरता आणत आहे. तातडीच्या रिपोर्टनुसार 26,100-26000 या पातळीवर आहे. तर 26,200-26325 वर रेझिस्टन्स आहे. असे एनरिच मनीचे CEO पोनमुदी यांनी सांगितले.












