Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सुकन्या समृद्धी योजनेत करा गुंतवणूक; सुरक्षित करा तुमच्या मुलींचे शिक्षण
बिजनेस

सुकन्या समृद्धी योजनेत करा गुंतवणूक; सुरक्षित करा तुमच्या मुलींचे शिक्षण

A symbolic image showing a secure investment under the Sukanya Samriddhi Yojana for a girl child’s education

Sukanya Samriddhi Yojana investment : मुलीच्या जन्मापासूनच अनेक आईवडील शिक्षण, करिअर, आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन करून ठेवतात. अनेक जण बँकेत वेगळा फंड जमा करतात. तुम्हाला देखील अशी योजना हवी आहे का ? ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षितरित्या गुंतवणूक करू शकतात. तर सुकन्या योजनेचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकतात.

काय आहे ही योजना

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने मुलींसाठी सुरु केलेली योजना आहे. ही एक सरकारी योजना आहे. ज्यात तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर मिळणारे व्या, मॅक्युरिटी रकमेची गॅरंटी देण्यात येते. आईवडील या योजनेच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण, करिअर आणि लग्नासाठी या सर्वांचे तुम्ही आर्थिक नियोजन करून ठेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आकर्षक रिटर्न तर मिळतोच पण कर सवलत देखील मिळते. या योजनेत तुम्ही 2000 रुपये भरून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतात.

हे ही वाचा : सावधान ! 31 डिसेंबर आधारकार्ड पॅनकार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख; अन्यथा पॅनकार्ड होणार निष्क्रिय

250 रुपयांपासून 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींच्या नावावर खाते उघडू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 250 रुपयांपासून 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक तुम्ही पैसे भरल्यापासून 15 वर्षांपर्यंत करावी लागते. आणि त्यानंतर 6 वर्ष तुम्हाला गुंतवणूक करावी लागत नाही. म्हणजे तुम्ही 15 वर्षे पैसे भरू शकतात. आणि हे अकाउंट 21 वर्षापर्यंत सुरु राहते. म्हणजे 6 वर्ष तुम्हाला एकही रुपया भरण्याची गरज नाही.

एवढे मिळणार व्याजदर

केंद्र सरकारने सुरु केलेली ही सुकन्या समृद्धी योजना वार्षिक 8.2 टक्के व्याजदर देते. या योजनेत देण्यात आलेलं व्याजदर हे केंद्र सरकार प्रत्येक तीन महिन्यांनी जमा करते. तर तुम्हाला या योजनेमुळे कर सवलतीत देखील फायदा होऊ शकतो. जर आईवडील प्रत्येक महिन्याला 2000 रुपये गुंतवत असतील तर वार्षिक गुंतवणूक 24000 एवढी होते. म्हणजे 15 वर्षात 3.6 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही करतात. आणि 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातात 9 लाख 60 हजार ते 10 लाख रुपयांची रक्कम मिळेल.

एवढी रक्कम काढण्याची मूभा

या योजना येत तुम्ही खाते उघडल्यानंतर पूर्ण रक्कम 21 वर्षानंतर मिळते. जर तुम्हाला मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ही रक्कम आवश्यक असेल तर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकतात.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts