Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ: अमर सिंह चहल आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तपासाला वेग
Mumbai

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ: अमर सिंह चहल आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तपासाला वेग

Police investigation intensifies in cyber fraud case after Amar Singh Chahal suicide attempt

Amar Singh Chahal cyber fraud case : ज्येष्ठ भारतीय पोलीस प्रशासनातील माजी सेवानिवृत्त अधिकारी अमर सिंह चहल यांनी आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना समोर आली असून, सध्या त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उघडकीस आलेल्या सायबर फसवणूक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रकरणाचा तपास सुरू

या प्रकरणात मिरा-भाईंदर येथील भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर व त्याच्या इतर साथीदारांनी मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात तपासासाठी पंजाब पोलीस नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, चौकशीअंती काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात शेरा ठाकूर व संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

हे ही वाचा : धक्कादायक! अकोल्यात तंबाखू मागण्यावरून वाद; 41 वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

शेरा ठाकूरचा एक साथीदार ताब्यात

याच प्रकरणात शेरा ठाकूरचा एक साथीदार ताब्यात घेण्यात आला असून, पूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला ‘पांडे’ नावाचा बुकीही या टोळीचा भाग असल्याची माहिती समोर येत आहे. पांडे हा सट्टेबाजी प्रकरणात यापूर्वीही संशयित राहिलेला असून, त्याचा या सायबर फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय आहे.

बेकायदेशीर सट्टेबाजी चालवत असल्याचीही माहिती

दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरात काही व्यक्ती क्रिकेट सट्टा व अन्य बेकायदेशीर सट्टेबाजी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास झाल्यास आणखी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांकडून आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि डिजिटल पुरावे यांचा सखोल छडा लावला जात असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts