Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • अमेरिकेचा महाप्रहार! इराणच्या युद्धनौका उद्ध्वस्त, हजारो तळांवर बॉम्बवर्षाव
Top News

अमेरिकेचा महाप्रहार! इराणच्या युद्धनौका उद्ध्वस्त, हजारो तळांवर बॉम्बवर्षाव

America Attack On Iran | मागील काही दिवसांपासून अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच इराणने अमेरिकेवर जोरदार हल्ला केला होता. 500 हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 2000 ड्रोनचा हल्ला इराणने अमेरिकेवर केला होता. पण, हा हल्ला अमेरिकेने रोखत आता इराणवर त्यांनी प्रतिहार केला आहे, ज्यामध्ये इराणच्या युद्धनौका उद्धवस्त झाल्या आहेत.

हेही वाचा – भारताचा कोणत्या देशाला पाठिंबा? युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

इराणने अमेरिका आणि इस्त्रायल तळांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन, मिसाईलचा वापर करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अमेरिकेच्या लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत इराणचे सर्व हल्ले हवेतच नष्ट केले. त्यानंतर आक्रमक झालेल्या अमेरिकेने इराणवर प्रतिहार केला आहे.

अमेरिकेकडून इराणचे नौदल पूर्णपणे निकामी

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, या युद्धात अमेरिकेने इराणच्या 17 युद्धनौका पाण्यातच उद्धवस्त केल्या आहेत. तर 2000 हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

या हल्ल्याबाबत अमेरिकन सेंट्रल कमांडचे अधिकारी ब्रॅड कूपर यांनी म्हटलं आहे की, आज ओसामानचा उपसागर, अरबी समुद्र आणि होर्मुजची सामुद्रधुणीमध्ये इराणचे एकही जहाज शिल्लक राहिलेले नाहीये. त्यांचे नौदल आम्ही पूर्णपणे निकामी केले आहे”, असं ब्रॅड कूपर यांनी सांगितलं.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts