Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • निरंकार कॉटेक्स व जगदंबा जिनिंगमध्ये धाडसी चोरी; 16 लाखांचा ऐवज लंपास
गुन्हा

निरंकार कॉटेक्स व जगदंबा जिनिंगमध्ये धाडसी चोरी; 16 लाखांचा ऐवज लंपास

Theft at Nirankar Cottex and Jagdamba Ginning

Theft at Nirankar Cottex and Jagdamba Ginning : वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निरंकार कॉटेक्स व जगदंबा जिनिंग या दोन फॅक्टरींमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल १६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे समजते. चोरटे फॅक्टरीत घुसून रोख रक्कम व मौल्यवान साहित्य चोरून पसार झाले.

शास्त्रीय पद्धतीने पुरावे गोळा करण्यात आले

विशेष म्हणजे, चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व डॉग स्क्वॉड दाखल होऊन शास्त्रीय पद्धतीने पुरावे गोळा करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले व ठाणेदार मंगेश भोयर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तळेगाव तळेगाव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हे ही वाचाशिरपूरात ATM चोरीचा थरारक प्रयत्न; 45 मिनिटांचा पाठलाग करून दोन आरोपी अटकेत

भीतीचे वातावरण

दरम्यान, अपुऱ्या पोलीस स्टाफमुळे चोरट्यांना चांगलेच फावते असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे, एक महिन्यापूर्वी शेजारील जिनिंगमध्ये १२ लाखांची चोरी झाली होती; मात्र त्या प्रकरणाचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. सलग होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी

ग्रामस्थ व उद्योजकांनी रात्रीची गस्त वाढवणे, औद्योगिक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, तसेच सीसीटीव्ही व प्रकाशव्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts