Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • डोंबिवलीत धक्कादायक प्रकार! नामांकित डॉक्टरचे नर्सशी प्रेमसंबंध, १० बियर अन् ४५ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न
Top News

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार! नामांकित डॉक्टरचे नर्सशी प्रेमसंबंध, १० बियर अन् ४५ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

Attempted suicide by taking pills

Attempted suicide by taking pills : डोंबिवलीतून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नामांकित बड्या हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरने तब्बल १० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संबंधित डॉक्टर हे डोंबिवलीतील एका नामांकित हॉस्पिटलचे संचालक असून त्यांची पत्नी देखील डॉक्टर आहे. दोघे मिळून हॉस्पिटलचा कारभार पाहतात. नर्ससोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधातून ही घटना घटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – नेपाळमध्ये मोठा अपघात; नदीत बस कोसळून 18 प्रवाशांचा मृत्यू

डॉक्टरांनी फोन न उचलल्याने संशय

घटनेच्या दिवशी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी फोन न उचलल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर कर्मचारी त्यांच्या राहत्या घरी गेले. कसाबसा दरवाजा उघडण्यात आला असता डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळले. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

डॉक्टरचे हॉस्पिटलमधील नर्ससोबत प्रेमसंबंध

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टरचे हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. या कारणावरून पत्नीशी वारंवार वाद होत होते. त्यानंतर डॉक्टर डोंबिवली पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत स्वतंत्र राहत होते. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून झालेल्या या कृतीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नर्सने डॉक्टरांकडे लग्नासाठी धरला होता आग्रह

दरम्यान, संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नासाठी आग्रह धरला होता. मात्र डॉक्टर विवाहित असल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर नर्सने डॉक्टरांशी बोलणे बंद केले. याच कारणामुळे डॉक्टर मानसिक तणावात होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. या नैराश्यातूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts