Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जपानी मुलीचा व्हिडीओ शेअर करत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे RSS वर डागली तोफ..
Top News

जपानी मुलीचा व्हिडीओ शेअर करत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे RSS वर डागली तोफ..

Raj Thackeray on RSS

Raj Thackeray on RSS : मराठी भाषा, मराठी अस्मिता या मुद्यावरून राज्यात नेहमी चर्चा होत असते, तापलेलं असतं. मराठी भाषा दिनही आता जवळ आला आहे. मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेवरू टिपण्णी केली होती. भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे भाषेच्या आधारावर वाद करणे म्हणजे स्थानिक आजार असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोहन भागवतांना खडे बोल सुनावले होते. आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून एक पोस्ट लिहीली असून त्यात त्यांनी मराठी शिकणाऱ्या जपानी मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी तिचं कौतुक तर केलंच पण याच पोस्टमधून त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर पुन्हा एकदा ठाकरी तोफ डागली आहे.

सध्या एका जपानी मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ती मराठी भाषेतील काही शब्द, काही वाक्य उच्चारताना दिसतेय. हा व्हिडीओ तुम्हीही आत्तापर्यंत पाहिला असेल. आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्या मुलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी तिचं, भाषा शिकण्याच्या वृत्तीचं कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांना चपराक लगावली असून भाषेवरून बोलाणाऱ्या मोहन भागवता यांनाही टोला लगवाल आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट काय आहे…

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा ‘मराठी’ आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात.

राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने मराठीत अभिवादन केलं

मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही.

आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही

मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही, अशी पोस्ट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मिडियावर शेअर केलीय.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts