Dr Snehal Ghughe viral video : काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी गर्जे – पालवे यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता या प्रकरणानंतर पुण्यातील रहिवासी असलेल्या स्नेहल घुगे या महिला डॉक्टरचा एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये गौरी गर्जे नंतर आता माझा बळी जाणार असल्याचे भाष्य करण्यात आले आहे.
काही दिवसांपासून चर्चेत असलेले डॉ. गौरी गर्जे या प्रकरणानंतर आता माझा बळी जाणार असल्याचे भाष्य पुण्यातील डॉक्टर महिला स्नेहल घुगे यांनी केले आहे. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे कि, तिचा साडे तीन वर्षांपासून छळ सुरु असल्याचा आरोप लागवण्यात आला आहे. एवढेच नाही तर डॉ. स्नेहल घुगे यांनी भाजप आमदार नारायण कुचे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे नाव घेत अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर लगावले आहे.
पती 11 महिन्यापासून फरार
डॉ. स्नेहल घुगे यांनी रवींद्र घुगे यांच्याशी 3 वर्षांपूर्वी लग्न केले होते. लग्नानंतर तिच्या पतीचे 2 मुलींसोबत अफेअर असल्याचे तिला समजले होते. या संदर्भात तिने विचारपूस केली असता तिला मारहाण करण्यात आल्याचे तिने सांगितले. तर 11 महिन्यांपासून तिचा पती गायब असून घटस्फोटाचे वारे लागल्याने तो माझ्यासोबत राहत नसल्याचे आरोप स्नेहल घुगे यांनी तिच्या पत्नीवर लगावला आहे.
नणंदवर आरोप
डॉ. स्नेहल घुगे यांनी सांगितलं कि, तिचा तिची नणंद योगिता संजय सानप यांच्याकडून छळ होत आहे. ती आमदार नारायण कुचे यांची कार्यकर्ती असल्याचेही तिने सांगितले. तसेच ती नारायण कुचे यांचे नाव घेत धमकी असून आम्ही कुचे साहेबांचे नाव सांगून पाच-दहा लाख रुपये दिले तर आम्ही बाहेर निघू. तु कोणतीही केस केलीस तरी आम्ही बाहेर पडू अशा धमक्या ते देत असल्याचेही या व्हिडीओ मध्ये तिने स्पष्ट केले.
हे ही वाचा : दुर्दैवी अपघात! कारवर भरधाव डंपर पलटला, अंत्यसंस्काराला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
पोलीस अधीक्षकाने देखील केला तक्रार करण्यास विरोध
यासोबतच पोलीस अधीक्षकांनी देखील तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे तिने स्पष्ट केले. राजकीय कनेक्शन असल्या कारणाने प्रशासन देखील मदत करणार नसून आम्ही संरक्षण देऊ शकणार नाही, तक्रारही दाखल करुन घेणार नाही, तुम्ही लोकांच्या घरात घुसाल तर मार खाण्याची तयारी ठेवा असे उत्तर त्यांनी दिल्याचे आरोप स्नेहल घुगेंनी स्पष्ट केले असून माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप स्नेहल घुगे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.
चित्रा वाघ यांच्यावर देखील गंभीर आरोप
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यास गेल्या असता नारायण कुचे यांचे नाव मध्ये आल्याने त्यांनी मदत करण्यास टाळाटाळ केल्याचा देखील आरोप लगावला आहे. तु घटस्फोट घेऊन मोकळी हो, असा सल्ला चित्र वाघ यांनी दिला.
काय आहे या व्हिडीओ मध्ये
मी आत्महत्या करणार नसून माझा फक्त खून होण्याची शक्यता आहे. माझा खून होऊन आत्महत्या केल्याचे दाखवली जाऊ शकते. असे वक्तव्य तिने केले आहे. आणि असं काही घडल्यास माझ्या सासरची मंडळी याला कारणीभूतअसतील असे देखील तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.












