Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आम्हाला वंशाचा दिवा हवा म्हणत इंजिनियर विवाहितेने संपवले जीवन; तीन वर्षाच्या मुलीसमोरच घेतला गळफास
Pune

आम्हाला वंशाचा दिवा हवा म्हणत इंजिनियर विवाहितेने संपवले जीवन; तीन वर्षाच्या मुलीसमोरच घेतला गळफास

Engineer Woman Suicide Case

Engineer Woman Suicide Case : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने शनिवारी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुण्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील उरुळी कांचन जवळ असलेल्या सोरतापवाडी याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला असून दीप्ती मगर चौधरी असे या आत्महत्या करून जीवन संपवलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सासरे सरपंच आणि सासू शिक्षिका असून देखील विकृत मानसिकतेमुळे विवाहितेला जीवनयात्रा संपवावी लागली. तिचा गर्भपात करण्यात आल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. याप्रकरणी मृत दीप्तीची आई यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये दीप्तीवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल माहिती देण्यात आली. एवढेच नाही तर तिचा गर्भपात गर्भलिंग निदान देखील करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली.

दुसरीही मुलगी असल्याच्या कारणाने मारहाण

पोलिसांकडे नमूद करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2025 या कालावधीत माझी मुलगी दिप्ती ही माहेरी आली होती . तेव्हा ती प्रचंड मानसिकरित्या खचलेली आणि नाराज दिसत होती. त्यावेळी मी दिप्तीला विचारले कि, खूप नाराज दिसत आहे तेव्हा तिने मोठ्याने टाहो फोडला. आणि त्यानंतर मी तिला जवळ घेवून शांत करत काय झाले असं विचारले. त्यानंतर तिने सांगितले कि, माझ्या पोटात दुसरीही मुलगी असल्या कारणास्तव जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी करण्यास माझ्या नवऱ्याने सांगितले. मी स्पष्टपणे नकार दिला. त्या कारणावरून माझ्या पतीने मला मारहाण केली आणि शिवीगाळ दमदाटी केली.

हे ही वाचाराहुरीत थरारक हत्या उघड; पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट, प्रियकर अटकेत

ईच्छा नसताना गर्भनिदान चाचणी

नवऱ्याने मारहाण केल्यानंतर माझी सासू आणि सासरे म्हणाले कि, आम्हाला वंशाला दिवा हवा आहे, तु गर्भ निदान चाचणी करणार नसशील तर आमच्या घरातुन चालती हो. आणि याबाबत तुझ्या माहेरी सांगु नको. यामुळे नवरा रोहन व सासु सुनिता, सासरे कारभारी यांनी दमदाटी आणि दबाव टाकल्यामुळे दिप्तीने इच्छा नसताना गर्भलिंग तपासणी केली. आणि पोटात असलेले बाळ हे मुलगी असल्याचे समजले. आणि हे समजताच माझा गर्भपात करण्यात आल्याचे देखील दिप्तीने तिच्या आईला सांगितले. यावेळी दीप्तीच्या आईला धक्का बसला परंतु त्यांनी तिला आधार देत समजावुन सांगितले आणि शांत केले.

3 वर्षाच्या मुलीसमोरच घेतला गळफास

मृत विवाहित दिप्तीला तीन वर्षाची पहिली मुलगी आहे. तिने तिच्या 3 वर्षाच्या मुलीसमोरच गळफास घेऊन जीवन संपवलं. याप्रकरणी आता उरुळी कांचन पोलिसांनी दीप्तीचे पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच या चौघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नात 50 तोळे सोने केले देऊ

2019 यावर्षी दीप्ती आणि रोहन यांचा विवाह झाला होता. यावेळी लग्नामध्ये 50 तोळे सोने देण्यात आले होते. विवाहित दीप्तीच्या चरित्रावर संशय घेणे, दिसायला सुंदर नाही, घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप लागवण्यात आले. आणि तिचा छळ करण्यात आला. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी माहेरून तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते. परंतु तरीही त्रास सुरूच होता. आणि शेवटी दीप्तीने शनिवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपवले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts