Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • विद्येचे माहेरघर हादरले ! वाघोलीत आईने चाकूने चिरला मुलाचा गळा, मुलीवरही सपासप वार
Pune

विद्येचे माहेरघर हादरले ! वाघोलीत आईने चाकूने चिरला मुलाचा गळा, मुलीवरही सपासप वार

Wagholi Mother Kills Son

Wagholi Mother Kills Son : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दिवसेंदिवस खुनाच्या घटना समोर येत आहेत. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोली भागात एका महिलेने 11 वर्षीय मुलाची चाकूने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर 13 वर्षांच्या मुलीवर देखील चाकूने सपासप वार केल्याचे समोर आले. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय हे घटना

पुणे येथील वाघोली परिसरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या 11 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून केल्याची धकाकदायक घटना उघडकीस आली आहे. याच घटनेत 13 वर्षांच्या मुलीव देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने ती मुलगी बचावली आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना असल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचाआम्हाला वंशाचा दिवा हवा म्हणत इंजिनियर विवाहितेने संपवले जीवन; तीन वर्षाच्या मुलीसमोरच घेतला गळफास

11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

ही घटना वाघोली येथील बाईफ रोड परिसरात घडली. सोनी संतोष जायभाय असं या महिलेचे नाव असून ती मूळची कंधार, जिल्हा नांदेड, येथील रहिवासी आहे. तसेच सध्या वाघोली येथे बायफ रोडवर वास्तव्यास आहे. या घटनेत 11 वर्षांचा मुलगा साईराज संतोष जायभाय याचा जागीच मृत्यू झाला. तर 13 वर्षांची मुलगी धनश्री संतोष जायभाय गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटना का घडली

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून या महिलेने हे कृत्य का केले? यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलिसांकडून तिची चौकशी करण्यात येत असून नेमका कौटुंबिक वाद की मानसिक तणावातून हा प्रकार झाला हे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे वाघोलीत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts