Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
गुन्हा

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार; दोघे गंभीर

Head-on collision between two-wheelers

Head-on collision between two-wheelers : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुपल्ली गावाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या समोरासमोर झालेल्या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. रमेश धर्मा मडावी असे मृताचे नाव आहे. या अपघातात विलास भगवान टेकाम आणि सोमजी मडावी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – अनोळखी तरुणाची हत्या करून पोत्यात बांधून फेकला मृतदेह, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एटापल्ली येथून मजुरीचे काम आटोपून रमेश धर्मा मडावी (रा.नलगोन्डा, तेलंगणा) हे आपले सहकारी विलास भगवान टेकाम यांच्यासोबत दुचाकीवरून आलापल्लीकडे जात होते. त्याचवेळी करपनफुडी (ता.एटापल्ली) येथील सोमजी मडावी हे समोरून दुचाकीवरून येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघेही गंभीर जखमी झाले. यात रमेश मडावी यांचा जागीच मृत्यू झाला.

वाहतूक नियंत्रक उपाययोजना करण्याची मागणी

अपघाताची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस करीत आहेत. एटापल्ली- गुरुपल्ली मार्गावर वेगमर्यादेचे पालन केले जात नाही. त्यामुळे या मार्गावर तातडीने वाहतूक नियंत्रक पोलिसाच्या नियुक्तीसह सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts