Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • खरात बाबाच्या लीला! तू माझी प्रेयसी हो, नाहीतर तुझा होणारा नवरा मरेल!
Top News

खरात बाबाच्या लीला! तू माझी प्रेयसी हो, नाहीतर तुझा होणारा नवरा मरेल!

Ashok Kharat Crime News

Ashok Kharat Crime News : “तू माझी प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होऊन तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल. मी तुला एकप्रकारे पवित्र करीत आहे,” ही वाक्यं आहेत त्या स्वयंघोषित ज्योतिषी बाबाची. ज्याचे पाय परातीत घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्याचे पाय धुतले. मोठमोठे राजकारणी, कलाकार त्याच्या आजूबाजूला घिरट्या घालताना दिसले. आधी पेढा चारायचा मग तांब्यातलं पाणी पाजायचं आणि पीडितेला गुंगी आली की, तिच्याशी लगट करून तिला आपल्या वासनेचा शिकार बनवायचा. आतापर्यंत या बाबाच्या अत्याचाराला किती महिला बळी पडल्या असतील कुणास ठाऊक? कोण आहे हा स्वयंघोषित ज्योतिषी बाबा? कसं फुटलं त्याचं बिंग? या बाबाच्या फाइल्समध्ये आणखी काय-काय दडलंय?

हेही वाचा – अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; फार्महाऊसवर शस्त्र अन् SIT ची मोठी कारवाई

पेढा खाऊन आणि पाणी पिऊन पीडितेला गुंगी आली

नोव्हेंबर 2022 स्वयंघोषित ज्योतिषी खरात बाबाच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात एक पीडित तरूणी कोणत्या तरी विधीबाबत चर्चा करण्यासाठी एकटी गेली. आता हा बाबा नुसता बाबा नव्हता तो तर संधीसाधू बाबा! त्यानं ती एकटी आल्याची संधी साधली आणि ऑफिसच्या चेंबरमध्ये बोलावून घेतलं. सुरुवातीला प्रसाद म्हणून पेढा खायला दिला मग तांब्याच्या भांड्यात असलेलं पाणी पाजलं. पेढा खाऊन आणि पाणी पिऊन पीडितेला गुंगी आली. तिचं डोकं जड झालं. पीडिता आपल्या जाळ्यात आल्याचं पाहाताच बाबा चुरूचुरू बोलायला लागला,’ तू माझी प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होऊन तुझा होणारा नवरा मृत्युमुखी पडेल. मी तुला एकप्रकारे पवित्र करीत आहे. ‘ मग मात्र खरात बाबानं तिच्याशी लगट करायला सुरुवात केली आणि बळजबरी करत तिच्यावर अत्याचार केला.

तुला माझ्याकडं येऊन काही विधी कराव्या लागतील

2019 मध्ये कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात या पीडितेची बाबाशी ओळख झाली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचे दाजीदेखील होते. ‘मला दैवीशक्ती प्राप्त आहे, त्या शक्तीच्या सामर्थ्यानं मी तुझ्या आयुष्यात असलेले अडथळे दूर करेन. तुझं श्रीमंत घराण्यात लग्न होईल, करिअर देखील घडेल, मात्र त्यासाठी तुला माझ्याकडं येऊन काही विधी कराव्या लागतील…’ असं सांगून त्या पीडितेचा विश्वास संपादन केला. नंतर दोन वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये पीडितेचा तिच्या गावाकडं साखरपुडा झाला पण तो मोडला.

पिडीतेकडून ५० हजारांची रोख रक्कम घेतली

त्यानंतर खरात बाबानं तिला धीर देत तिच्याकडून 50 हजार रूपये रोख घेऊन ‘पुष्कराज’चा खडा दिला. ‘हा खडा ‘सिद्ध’ करून दिलाय बरं का, तो गळ्यात घालण्यास सुरुवात कर, तुझं कल्याण होईल…’ असं थातूरमातूर बोलून पुन्हा एकदा तिचा विश्वास मिळवला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये या पीडितेला दुसरं स्थळ आलं. साखरपुडा होऊन पुढं लग्नही झालं.

24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली

पीडितेचं लग्न झाल्याचं कळाल्यानंतर खरात बाबानं तिला जोडीनं आशीर्वाद घेण्यासाठी कार्यालयात बोलावून घेतलं आणि पुन्हा त्याच पद्धतीनं तिच्यावर अत्याचार केला. याच पीडितेच्या फिर्यादीमुळं या खरात बाबाचं बिंग फुटलं आणि मंगळवारी रात्री त्याला अटक होऊन 7 दिवसांची म्हणजे 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

खरात बाबाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

खरात बाबाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यानं नाशकातल्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेलं ईशान्येश्वर मंदिर आणि स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टची चर्चा सुरू झाली. या त्याच्या ईशान्येश्वर मंदिरास आजवर अनेक राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या ट्रस्टवर त्यानं राजकीय क्षेत्रातील विविध मातब्बरांची वर्णी लावली आहे.

रूपाली चाकणकर श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या सदस्य

त्यातलंच एक प्रसिद्ध नाव म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर. रूपाली चाकणकर या ट्रस्टच्या सदस्य आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये रूपाली चाकणकर खरातबाबाचं पाद्यपूजन करताना दिसतायत, तर एका व्हायरल फोटोमध्ये त्यांनी खरातबाबाच्या डोक्यावर छत्री धरल्याचं दिसून येतंय. हा फोटो पाहून ‘वासनांध बाबाच्या डोक्यावर राज्य महिला आयोगाचं कृपाछत्र,’ असं म्हणण्याची वेळ आलीये.

श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे उभारणी

खरातबाबानं सुमारे 17 वर्षांपूर्वी श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली. शिर्डीला येणारे अनेक भाविक सिन्नर-शिर्डी रस्त्याकडेला असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी जायचे. इतकंच नव्हे, तर अनेक बडे राजकारणी, उद्योजक व कलाकारही या मंदिरात दर्शनाला जायचे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts