Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • RTE Admission 2026: इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी; आता RTE अर्ज ‘या’ तारखेपर्यंत करता येणार, पालकांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
Top News

RTE Admission 2026: इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी; आता RTE अर्ज ‘या’ तारखेपर्यंत करता येणार, पालकांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

RTE

Free RTE School Admissions 2026 in Maharashtra: विद्यार्थ्यां आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. RTE अर्ज प्रक्रिया सुरू असून या तारखेपर्यंत अर्ज करता येऊ शकते. फक्त पालकांनी या महत्वाच्या सूचना लक्षात ठेवा.

शिक्षणाचा हक्क कायदा (RTE) अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी सध्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत अलीकडेच एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेचे अंतर केवळ एक किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्याचा नियम शिथिल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Horoscope: 17 मार्च! पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत काय सांगतात ग्रह? वाचा आजचे राशिभविष्य

नवीन नियमानुसार आता पालकांना आपल्या घरापासून १ ते ५ किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच अर्जामध्ये बदल करणे किंवा नवीन अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

पूर्वी,१२ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, आरटीई प्रवेशासाठी पालकांना फक्त घरापासून १ किलोमीटर अंतरातील शाळाच निवडण्याची परवानगी होती. या निर्णयाविरोधात काही पालकांनी मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने स्पष्ट

यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, एक किलोमीटरची सक्ती योग्य नाही. जर विद्यार्थ्याच्या घराजवळ त्या अंतरात शाळा उपलब्ध नसेल, तर त्याला दूरच्या शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे शासनाने नियमांमध्ये सुधारणा करून पालकांना अधिक अंतरावरील शाळांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे न्यायालयाने निर्देश दिले.

नवीन सुधारणांनुसार आता पालकांना प्रथम १ किमी, त्यानंतर ३ किमी आणि शेवटी ५ किमी अंतरातील शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे. तसेच १६ मार्चपर्यंत ज्या पालकांनी आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यात प्रवेशासाठी अर्ज केला आहे, त्यांना पोर्टलवर अर्ज ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा दिली जाणार आहे. याबाबत संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप संदेशाद्वारे सूचना दिल्या जातील.

पालकांसाठी महत्त्वाची सूचना

RTE प्रवेशासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करावा लागतो.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

25 मार्चनंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार असल्याने पालकांनी वेळेत अर्ज पूर्ण करावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया

https://student.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
घरापासून १–५ किलोमीटर अंतरातील शाळा निवडा (प्राथमिकता: १ → ३ → ५ किमी).
जन्मतारखे, आधार, निवास पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा.
फॉर्म कन्फर्म करून सबमिट करा
पोर्टलवर प्रवेशाची अधिसूचना मिळेल; शाळेत प्रत्यक्ष दाखल करा.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts