• Home
  • देश
  • पाकिस्तानने काबूलला केले टार्गेट; रूग्णालयावर केला भीषण हल्ला, 400 हून अधिक लोकांचा मृत्यू
Top News

पाकिस्तानने काबूलला केले टार्गेट; रूग्णालयावर केला भीषण हल्ला, 400 हून अधिक लोकांचा मृत्यू

pak vs kabul

Pakistan Attack On Kabul | पाकिस्तानने (Pakistan) सोमवारी (16 मार्च) रात्री अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलला (Kabul) लक्ष्य केले होते. पाकिस्तानने काबूलवर जोरदार हल्ला केला. काबूलमधील एका रूग्णालयावर पाकिस्तानने मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – “जर इराणला अणुशस्त्रे मिळाली तर जगाचा…”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य, दिला मोठा इशारा

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काबूलमधील रूग्णालय उद्ध्वस्त

या हल्ल्याबाबतची माहिती अफगाणिस्तानच्या उपसरकारच्या प्रवक्त्यांनी दिली. पाकिस्तानने काबूलमधील ड्रग्ज व्यसनींवर उपचार करणाऱ्या मोठ्या रूग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये रूग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे, अशी माहिती अफगाणिस्तानच्या उपसरकारच्या प्रवक्त्यांनी दिली.

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काबूलमधील रूग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. रूग्णालयावर हल्ला झाल्यानंतर रूग्णालयात मोठी आग लागली होती. तर आता बचाव पथक ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या हल्ल्यात मृतांचा आकडा हा 400 च्या वर पोहोचला आहे तर 250 लोक गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

या हल्ल्याबाबत अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत जमाव यांनी सांगितले की, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात संपूर्ण रूग्णालय उद्ध्वस्त झाले आहे. तसेच अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामायिक सीमेवर दोन्ही बाजूंमध्ये युद्धविरामाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काही तासांमध्येच पाकिस्तानने हा हल्ला केला. गेल्या अनेक वर्षांतील सर्वांत प्राणघातक हा हल्ला आहे, असं जमाव म्हणाले.

पाकिस्तानने अफगाणिस्तानने केलेले दावे फेटाळले

अफगाणिस्तान पाकिस्तानच्या लष्करावर हवाई हल्ल्यांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनींवर उपचार करणाऱ्या काबूलमधील रुग्णालयावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मोशर्रफ झैदी यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी अफगाणिस्तानचे आरोप फेटाळून लावत सांगितले की, पाकिस्तानने काबूलमधील कोणत्याही रुग्णालयाला लक्ष्य केलेले नाही. काबूल व पूर्व अफगाणिस्तानमधील इतर ठिकाणी सोमवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये कोणत्याही रूग्णालयाला किंवा नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, अशी माहिती शरीफ यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अनेक शहरांवर हवाई हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानने खोस्त प्रांतातील अलिशेर-तेरेझाई येथे डुरंड रेषेजवळ तोफखाना गोळीबार केला. या गोळीबारात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. तसेच पाकिस्तानी लढाऊ विमानांनी लष्करी तळांच्या नावाखाली निवासी वस्त्यांवर बॉम्बहल्ले केले आहेत, यामध्ये अनेक निष्पाप लहान मुलांना आणि महिलांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts