• Home
  • देश
  • पाकिस्तानकडून अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट? इंधन डेपो लक्ष्य केल्याचा तालिबानचा आरोप
Top News

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट? इंधन डेपो लक्ष्य केल्याचा तालिबानचा आरोप

afghanistan

Pakistan Attack On Afghanistan | एकिकडे अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये युद्ध (War) सुरू आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) आणि आफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) मोठा संघर्ष होताना दिसत आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये बॉम्बहल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका खाजगी विमान कंपनीच्या इंधन डेपोवर पाकिस्तानने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Supreme Court: मोठी बातमी! पेड पिरियड लीव्हवर याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; वाचा कोर्टाचे स्पष्टीकरण

पाकिस्तानने इंधन डेपोवर केला मोठा हल्ला

पाकिस्तानच्या हवाई दलाने कंधार विमानतळाजवळील खाजगी विमान कंपनी काम एअरच्या इंधन डेपोवर मोठा हल्ला केला आहे, अशी माहिती अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदने दिली आहे.

तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, काम एअर ही कंपनी देशांतर्गत विमान कंपन्यांना आणि संयुक्त राष्ट्रांच्या विमानांना इंधन पुरवते. तर पाकिस्तानने यापूर्वी राष्ट्रीय व्यापार हाजी खान झदाह यांच्या इंधन डेपोवर हल्ला केला होता.

पाकिस्तानी विमानांनी काम एअर या खाजगी विमान कंपनीच्या इंधन डेपोवर हल्ला केला आहे. हा डेपो फक्त नागरी विमानांसाठीच नाही तर संयुक्त राष्ट्रांच्या विमानांना देखील इंधन पुरवठा करण्याचं काम करतो. अशातच आता मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल संकट आधीच गडद असताना आता पाकिस्तानने इंधन साठ्यावर हल्ला केल्याने अफगाणिस्तानला मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलसह अनेक शहरांवर हवाई हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तर पाकिस्तानने खोस्त प्रांतातील अलिशेर-तेरेझाई येथे डुरंड रेषेजवळ तोफखाना गोळीबार केला. या गोळीबारात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. तसेच पाकिस्तानी लढाऊ विमानांनी लष्करी तळांच्या नावाखाली निवासी वस्त्यांवर बॉम्बहल्ले केले आहेत, यामध्ये अनेक निष्पाप लहान मुलांना आणि महिलांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्याबाबात अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केली की, डुरंड रेषेवर झालेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईमध्ये 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्याला खुले युद्ध म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यावर अफगाणिस्तानने कडक शब्दांत उत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीचा हिशोब घेतला जाईल, तसेच शिक्षा भोगल्याशिवाय हा हल्ला थांबणार नाही, असा थेट इशारा अफगाणिस्तानच्या प्रवक्त्याने दिला आहे. तसेच पाकिस्तानच्या 19 लष्करी चौक्या आपल्या ताब्यात घेतल्या असल्याची माहिती तालिबानने आपल्या निवेदनात दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts