• Home
  • मनोरंजन
  • वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता प्रेग्नंट? ‘बधाई हो…’ म्हणत अभिनेत्रीने स्वतःच केला मोठा खुलासा
Top News

वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता प्रेग्नंट? ‘बधाई हो…’ म्हणत अभिनेत्रीने स्वतःच केला मोठा खुलासा

neena gupta

Neena Gupta Pregnant | ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. नीना गुप्ता यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले मोठे स्थान निर्माण केले. तसेच आत्ता त्या जरी 66 वर्षांच्या असल्या तरी त्यांची फॅशन स्टाईल आणि त्यांच्या अदांनी चाहते नेहमीच घायाळ होताना दिसतात. त्या त्यांच्या हटके लूकने चाहत्यांना नेहमीच अवाक करत असतात, त्यामुळे नीना गुप्ता या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. तर आताही नीना गुप्ता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.

हेही वाचा – अजित पवार विमान अपघाताबाबत रोहित पवारांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, “VSR च्या मालकानं ब्लॅक बॉक्समधील…”

नीना गुप्ता खरंच प्रेग्नंट?

सध्या सोशल मीडियावर नीना गुप्ता या प्रेग्नंट (Pregnant) असल्याच्या बातम्या जोरदार व्हायरल होत आहेत. वयाच्या 66 व्या वर्षी नीना गुप्ता या आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नीना गुप्ता खरंच प्रेग्नंट आहेत का? असा सवाल चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. तर आता याबाबत स्वत: नीना गुप्ता यांनी मोठा खुलासा केला आहे.

नीना गुप्ता यांनी काय केला खुलासा?

प्रेग्नंसीच्या बातम्यांवर नीना गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बॉलिवूड हंगामाला माहिती देताना नीनी गुप्ता यांनी सांगितले की, आता फक्त हेच ऐकायचं बाकी होतं. माझ्या आयुष्यात ‘बधाई हो’ सारखा एकच क्षण येण्याचं बाकी होतं. पण मी प्रेग्नंट नाहीये. मी विजय आणि रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये जी साडी नेसली होती तिचे कापड थोडे जाड होते. त्यामुळे मी नेहमीपेक्षा थोडी जास्त जाड दिसत होते. त्यामुळे माझ्या प्रेग्नंसीच्या अफवांना सुरूवात झाली.

पुढे त्या मिश्किलपणे म्हणाल्या की, या अफवांवर मला मनापासून आनंद वाटतो कारण या वयातही लोक मी प्रेग्नंट होऊ शकते या शक्यतांवर चर्चा करत आहेत. आपला समाज खरोखर बदलत आहे, हे यावरून सिद्ध होत आहे, असंही नीना गुप्ता म्हणाल्या.

https://www.instagram.com/reel/DViCeGZgHxS/?utm_source=ig_web_copy_link&igsh=NTc4MTIwNjQ2YQ==

नीना गुप्ता यांनी हैदराबादमध्ये असलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी Ivory साडी आणि त्यावर हॉल्टर नेक ब्लाउज परिधान केला होता. त्यांच्या या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. तर त्यांच्या या लूकनंतर त्यांच्या प्रेग्नंसीच्या अफवांना सुरूवात झाली होती. ज्यामुळे नीना गुप्ता सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts