Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या फेब्रुवारीत लग्न करणार असल्याच्या अफवांना एका वाक्यात फुलस्टॉप; या विषयावर रश्मिकाने सोडले मौन
मनोरंजन

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या फेब्रुवारीत लग्न करणार असल्याच्या अफवांना एका वाक्यात फुलस्टॉप; या विषयावर रश्मिकाने सोडले मौन

Rashmika Mandanna clarifies marriage rumours with Vijay Deverakonda
137

Rashmika Mandanna Vijay Deverakonda marriage : मनोरंजन विश्वात कधी कोणती अफवा पसरेल हे सांगता येत नाही. आता काही महिन्यांपासून रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंदा यांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु होती. दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येऊन लग्नाची तारीख देखील ठरल्याचे समजले होते. त्यानुसार येणाऱ्या वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये दोघेही लग्न गाठ बांधणार आहे असे वृत्त समोर आले होते. याबाबत आता रश्मिका मंदाना ने एका इंटरव्ह्यू मध्ये लग्नाच्या चर्चाबद्दल मौन सोडले आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी या लग्नाच्या चर्चाबद्दल कोणताच दुजोरा दिला नव्हता. दोघांनी देखील याबाबत अधिकृत माहिती शेअर केली नव्हती. परंतु त्यांना अनेकदा कार्यक्रमात सोबत पाहण्यात आले. एका कार्यक्रमावेळी तर रश्मीका इमोशनल होताना दिसली होती. तिने हॉलिवूड रिपोर्टर इंडियाने घेतलेल्या इंटरव्ह्यू मध्ये केलेल्या खुलास्यामुळे आता लग्नाच्या चर्चाना पूर्णविराम लागला आहे.

राजस्थानातील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं 26 फेब्रुवारी 2026 रोजी लग्न होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. हे लग्न कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या लग्नासाठी विजय देवकोंडा च्या जवळचे मित्र लग्नाची प्लॅनिंग करत आहेत. हे लग्न साउथ आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार असून हैदराबाद येथे काही महिन्यापूर्वीच विजय आणि रश्मिका यांचा साखरपुडा झाला होता अशी माहिती समोर आली होती.

हे ही वाचा : लग्नानंतर समंथाची दुसऱ्या पतीने देखील केली फसवणूक; जवळच्या व्यक्तीने केला खळबळजनक खुलासा सोशल मीडियावर चर्चाना उधाण

लग्नाच्या चर्चांवर काय म्हणाली रश्मीका

हॉलिवूड रिपोर्टर इंडियाने घेतलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला पुढील वर्षी,म्हणजेच 2026 च्या फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमध्ये विजय देवरकोंडाशी लग्न करणार असल्याच्या वृत्ताबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा “मला लग्नाची पुष्टी करायची नाहीये किंवा नकारही द्यायचा नाहीये. मी फक्त एवढंच म्हणेन की जेव्हा आम्हाला त्याबद्दल बोलण्याची गरज वाटेल, तेव्हा आम्ही बोलू” असं सांगत तिने या विषयावर आणखी भाष्य करणं टाळलं.

तेव्हापासून सुरु झाली दोघांच्या लग्नाबद्दल चर्चा

तू तुझ्या कोणत्या सहकलाकाराशी लग्न करशील, असा सवाल काही दिवसांपूर्वी रश्मिकाला विचारण्यात आला होता. तेव्हा तिने जराही न लाजता, स्पष्ट उत्तर दिलं होतं की, “हो, मी विजयशी लग्न करेन.” तिचा रिप्लाय ऐकून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांबाबत बरीच चर्चा सुरू झाली होती.

हे ही वाचा : ‘Single Papa’ वेब सिरीजमध्ये अभिनेता कुणाल खेमू दिसणार नव्या रूपात; 12 डिसेंबरला होणार रिलीज

प्रत्येकाच्या आयुष्यात विजय देवरकोंडा असावा

नोव्हेंबर मध्ये गर्लफ्रेंड या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये विजयच्या सपोर्टमुळे ती फार भावुक झाली होती. तिचा हा भावुक क्षण कॅमेरात देखील कैद झाला होता. याबद्दल तिला विचारले असता ती म्हणाली कि, “विजू, तू सुरुवातीपासूनच या चित्रपटाचा भाग असून चित्रपटाच्या यशाचा एक भाग आहे, या संपूर्ण प्रवासात तू पर्सनली होता. मी फक्त एवढीच आशा करेल कि, प्रत्येकाच्या आयुष्यात विजय देवरकोंडा असावा, कारण तो एक आशीर्वाद आहे.”

या कारणाने सुरु होती लग्नाची चर्चा

रश्मीका ला पुढचा प्रश्न विचारण्यात आला कि, तू तुझ्या कोणत्या सहकलाकारासोबत लग्न करशील ? यावर ती म्हणाली कि, हो, मी विजयशी लग्न करेल. हे वाक्य ती न लाजता ठामपणे म्हणाली. आणि यावर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता. तेव्हापासून या लग्नाच्या चर्चाना उधाण आले होते.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची पहिली भेट 2018 मध्ये गीता गोविंदम या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी प्रेक्षकांना दोघांचीही केमिस्ट्री अत्यंत भावली होती. त्यानंतर त्यांनी डीअर कॉम्रेड या चित्रपटात एकत्र दिसले. प्रेक्षकांना ही जोडी खऱ्या आयुष्यात देखील पाहायला मिळेल का यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts