• Home
  • देश
  • “जर इराणला अणुशस्त्रे मिळाली तर जगाचा…”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य, दिला मोठा इशारा
Top News

“जर इराणला अणुशस्त्रे मिळाली तर जगाचा…”, डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक वक्तव्य, दिला मोठा इशारा

trump

Donald Trump | इराण (Iran), अमेरिका (US) आणि इस्त्रायल (Israel) देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या देशांमधील युद्ध दिवसेंदिवस आणखी पेटताना दिसत आहेत. तर यादरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणबाबत खळबजनक वक्तव्य केलं असून मोठा इशारा दिला आहे. इराणला कधीही अणुशस्त्रे मिळू नयेत, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

हेही वाचा – लढाऊ विमानांमधून बॉम्ब टाकत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, चाबहार बंदराला केले टार्गेट

इराणबाबत काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर इराणला अणुशस्त्रे मिळाली तर ते त्याचा तात्काळ वापर करतील, ज्यामुळे संपूर्ण मध्य-पूर्व उद्धवस्त होईल. जर तुम्हाला वाटत असेल की इराणला अणुशास्त्रे मिळावीत तर तुमच्यात काहीतरी गडबड आहे, कारण इराण एका तासामध्ये किंवा काही दिवसांतच त्याचा वापर करेल आणि जगाचा मध्य-पूर्व भाग नष्ट करतील.

मला युद्ध नको आहे. इराणचे लोक क्रूर आहेत आणि हिंसकही. त्यांनी मागील आठवड्यात 32,000 आंदोलकांना ठार मारले आहे. तसेच इराण फक्त इस्त्रायललाच नाही तर संपूर्ण मध्य-पूर्वेला नष्ट करेल, असा खळबळजनक दावा ट्रम्प यांनी केला.

इराणच्या नेतृत्वाबाबत ट्रम्प यांनी केलं मोठं वक्तव्य

पुढे ते म्हणाले की, आम्ही इराणला दोन आठवड्यांमध्ये उद्धवस्त केले आहे. आता त्यांच्याकडे हवाई दल नाहीये, नौदल नाहीये, शस्त्रे नाहीयेत आणि सोबतच त्यांचे नेतृत्व देखील संपुष्टात आले आहे. त्यानंतर त्यांनी नवीन नेतृत्व स्थापन केले होते पण ते नेतृत्वही आता नाहीसे झाले आहे. ही कारवाई फक्त अमेरिकेच्या हितासाठीच नाही तर संपूर्ण जगाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली असल्याचंही, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतही भाष्य केले. बऱ्याच देशांना या सामुद्रधुनीतून 90 ते 95 टक्के ऊर्जा मिळते. तर आमच्याकडे फक्त एक छोटा चेक पॉइंट आहे त्याचा इराणने वर्षानुवर्षे चांगला वापर केला आहे. मात्र, आता ते काम करत नाहीत, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, मोजतबा खामेनेई जिवंत आहेत की नाही? असा सवाल डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सार्वजनिकरित्या मोजतबा खामेनेई एकदाही कुठे दिसले नाहीत. त्यांची इराणच्या सर्वोच्च पदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा पहिला संदेश जाहीरपणे न देता लेखी स्वरूपात देण्यात आला होता. त्यामुळे ते जिवंत आहेत की नाही, हे माहिती नाहीये, असं ट्र्म्प म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts