Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • लढाऊ विमानांमधून बॉम्ब टाकत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, चाबहार बंदराला केले टार्गेट
Top News

लढाऊ विमानांमधून बॉम्ब टाकत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, चाबहार बंदराला केले टार्गेट

America Attack On Iran Chabahar Port | सध्या अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील तणाव चांगलाच वाढला आहे. अमेरिकेने इराणवर पुन्हा एकदा भीषण हल्ला केला आहे. इराणच्या चाबहार बंदराजवळ (Chabahar Port) अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी बॉम्बहल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर इराणला मोठा धक्का बसला असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा – इराणचा पुन्हा दुबई विमानतळावर हल्ला, 19 भारतीय नागरिकांना अटक, नेमकं घडलं काय?

अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या चाबहार बंदरावर केला हल्ला

अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या चाबहार बंदाराला टार्गेटे केले होते. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी चाबहार बंदराजवळील व्यापारी क्षेत्रातील लष्करी तळांवर बॉम्ब टाकत हल्ला केला. या हल्ल्यात चाबहार बंदराचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर हल्ला केला होता. खार्ग बेट हे इराणच्या अर्थव्यवस्थेचे हृदय मानले जाते. तर या बेटावर अमेरिकेने हल्ला केला होता. त्यानंतर आता अमेरिकेच्या लष्कराने लढाऊ विमानांमधून बॉम्ब टाकत चाबहार बंदाराला टार्गेट केलं. या बंदरावर हल्ला केल्यानंतर स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले तसेच काळ्या धूराचे लोटही दिसत होते. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आता इराण नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मागील काही दिवसांपासून अमेरिका इराणवर हल्ला करताना दिसत आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या सामुद्रधुनीत अमेरिका, इस्त्रायलसह अनेक देशांचे तेलाचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. त्यामुळे आता तेलाच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून कोणत्याही देशाचे तेल वाहू जहाज जाऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. यामध्ये भारताचे देखील तेलाचे टँकर्स अडकले होते. मात्र, एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरग यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर भारताचे तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताचे दोन तेल वाहून नेणारी पुषक्र आणि परिमल ही जहाजे सुरक्षितरित्या पास झाली आहेत. तर आता या सामुद्रधुनीमध्ये इस्त्रायल, अमेरिका आणि युरोप या देशांचे तेल वाहू टँकर्स अडकले आहेत. इराणने दिलेल्या इशाऱ्यामुळे या तिन्ही देशांचे टँकर्स पास होण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

ज्या जहाजांना पुढे जायचे आहे त्यांनी इराणी नौदलाशी संपर्क साधावा. नौदलाशी चर्चा केल्यानंतर तुम्ही तुमचे तेल आणि गॅस टँकर जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून घेऊन जाऊ शकता. अमेरिका आणि इस्त्रायल या देशांचे जहाज वगळता अन्य देश आपले जहाज पुढे घेऊन जाऊ शकतात. मात्र, जे देश अमेरिकेला आणि इस्त्रायलला पाठिंबा देत आहेत अशा देशांना परवानगी नाकारली जाईल, असं इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts