• Home
  • देश
  • मोजतबा खामेनेईंची शस्त्रक्रिया, चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी? नेमके कुठे आणि कसे आहेत?
Top News

मोजतबा खामेनेईंची शस्त्रक्रिया, चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी? नेमके कुठे आणि कसे आहेत?

khamenei 1

Mojtaba Khamenei | मागील काही दिवसांपासून इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Iran Supreme Leader Mojtaba Khamenei) हे अमेरिका (US)-इस्त्रायलने (Israel) इराणवर केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. तसेच आताही मोजतबा खामेनेईंबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मोजतबा खामेनेई यांच्या हाताची आणि पायाची शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच त्यांना चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज असल्याचीही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – “दीदी जात आहे, भाजप येत आहे…”, बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजपची मोठी आघाडी? अमित शाहांचा मोठा दावा

मोजतबा खामेनेई यांची प्रकृती नेमकी कशी आहे?

समोर आलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनेई हे गंभीर जखमी आहेत. तरी देखील ते मानसिकदृष्ट्या सतर्क आणि सक्रिय आहेत. त्यांच्या एका पायावर तीन शस्त्रक्रिया झाल्या असून, आता ते कृत्रिम पाय वापरणार आहेत. तसेच मोजतबा खामेनेई यांच्या हातावरही शस्त्रक्रिया झाली असून तो हळूहळू बरा होत आहे. तर त्यांचा चेहरा आणि ओठ गंभीरपणे भाजले आहेत, ज्यामुळे त्यांना बोलणे कठीण झाले आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, मोजतबा खामेनेई यांना प्लास्टिक सर्जरीचीही गरज भासू शकते. सोबतच मोजतबा यांनी आत्तापर्यंत कोणतेही तोंडी निवेदन दिलेले नाही, कारण त्यांना कमकुवत किंवा असहाय्य दिसायचे नाही, त्यामुळे ते केवळ लेखी निवेदने देत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई हे जखमी झाले होते. मात्र, या हल्ल्यात ते बचावले असले तरी पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या मोजतबा यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे भेटीगाठींवर मर्यादा असून केवळ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीच त्यांची देखभाल करत आहेत. स्वतः हृदय शल्यचिकित्सक असलेले आरोग्य मंत्री आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन सध्या त्यांच्या उपचारांवर देखरेख करत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts