Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • नसरापूर प्रकरणात आरोपीची पोलीस कोठडी 12 मे पर्यंत वाढवली
गुन्हा

नसरापूर प्रकरणात आरोपीची पोलीस कोठडी 12 मे पर्यंत वाढवली

नसरापूर बलात्कार (Nasrapur Rape Case)

पुणे Nasrapur Murder Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका चार वर्षांच्या निरागस मुलीसोबत घडलेल्या घृणास्पद गुन्ह्यानं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्ररणात आता पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी (जेएमएफसी) मुख्य आरोपी 65 वर्षीय भीमराव कांबळे, याची पोलीस कोठडी 12 मे 2026 पर्यंत वाढवली आहे.

हेही वाचा : मुंबईत मासे कापायला बंदी! BMC Vs कोळी बांधव वाद पेटला

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला केलं हजर :

आरोपीची सुरुवातीची पोलीस कोठडी आज संपत होती, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळं, आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपासासाठी अधिक वेळ आवश्यक आहे, असा युक्तिवाद अभियोजन पक्षाने केला, जो न्यायालयाने मान्य केला.

संपूर्ण घटना काय? :

ही हृदयद्रावक घटना 1 मे 2026 रोजी घडली. आरोपी भीमराव कांबळे, याने चार वर्षांच्या निरागस मुलीला वासरू दाखवण्याच्या बहाण्याने गोशाळेत नेले. तिथे आरोपीने मुलीवर निर्घृणपणे हल्ला केला आणि आपली ओळख उघड होईल या भीतीने तिची हत्या केली. इतकेच नाही तर, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला.

विशेष तपास पथक स्थापन :

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली सहा अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. पोलीस सध्या आरोपीची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण आणि लैंगिक क्षमता चाचण्या करत आहेत. आरोपीला कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याची कोणतीही संधी मिळू नये, यासाठी एक भक्कम आरोपपत्र तयार करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे.

आरोपीवर अनेक गुन्हे दाखल :

तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, आरोपी भीमराव कांबळे यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील होता. 2015 मध्ये त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु पुराव्याअभावी 2019 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली. इतकेच नाही तर, 1998 मध्ये त्याच्यावर विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आता या जुन्या प्रकरणांमधील दुवेही जोडत आहेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts