Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • नसरापूर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय म्हणाले?
गुन्हा

नसरापूर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय म्हणाले?

पुणे Nasrapur Minor Girl Murder Case : जिल्ह्यातील नसरापूर गावात एका 65 वर्षीय नराधमानं एका निष्पाप मुलीचं लैंगिंक शोषण करुन तिची निर्घृण हत्या केली. या घृणास्पद गुन्ह्यामुळं राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आणि शनिवारी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, पोलिसांनी तातडीनं कारवाई करुन आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा : भोर हादरलं! साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला गोठ्यात नेलं, अत्याचार करून संपवलं; पाहा नेमकं काय घडलं?

काय म्हणाले मुख्यमंत्री :

पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होईल. शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यातील ही घटना अत्यंत निंदनीय आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीनं एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात होईल. अशा आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी असेल. यापूर्वी, महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले होतं की, तपास सुरु असून आरोपी कठोरतम शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

काय आहे प्रकरण? :

ही घटना काल पुण्यातील नसरापूर गावात घडली. प्राथमिक माहितीनुसार, मुलगी दुपारी बेपत्ता झाली आणि तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. शोधादरम्यान, मुलीचा छिन्नविछिन्न आणि रक्तानं माखलेला मृतदेह सापडला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी, एक वृद्ध व्यक्ती, त्या लहान मुलीला घेऊन जाताना दिसला, ज्यामुळं पोलिसांना त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यास मदत झाली.

गावकरी संतप्त :

या बलात्कार आणि हत्येमुळं स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. संतप्त गावकऱ्यांनी शनिवारी पुणे-बंगळूरु महामार्गही रोखला होता. एका व्यक्तीनं सांगितलं की, “मी या शोकाकुल समुदायाच्या पाठीशी उभा आहे. जरी आपण कायद्याच्या राज्याखाली राहत असलो तरी, जलदगती न्यायालयांच्या जलद निकाल देण्याच्या सततच्या अपयशामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे.” जेव्हा न्याय मिळायला अनेक वर्षे लागतात, तेव्हा गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती उरत नाही आणि हिंसाचाराचे चक्र सुरूच राहते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts