Solapur Murder Case: सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. सततच्या शेतीच्या वादातून दिराने आपल्या भावजयासह २ पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे आहे. या घटनेने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावात कौटूंबिक वादातून एक भीषण घटना घडली असून दिराने आपल्या भावजयीसह दोन पुतण्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: बारावीचा निकाल आज जाहीर; राज्यात यंदाही कोकण विभागाने मारली बाजी, तर पुन्हा लातूर पॅटर्न फेल
ही घटना शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हैद्राबाद महामार्गालगत असलेल्या बोरामणी गावात ही घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे पती यांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर शेतीच्या मालकी व वाचणीच्या .कारणावरून दिर आणि भावजयीमध्ये सतत वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांत हा वाद अधिक तीव्र झाला होता आणि त्यातून वारंवार भांडणे, मारहाण आणि शिवीगाळ होत होती.
शनिवारी पहाटेच्या सुमारास रागाच्या भरात दिराने भावजयी व तिच्या दोन मुलांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली आहे.












