Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • थरारक तिहेरी हत्याकांत, चेहऱ्यावर केक लावला म्हणून तिघांना संपवलं..
Top News

थरारक तिहेरी हत्याकांत, चेहऱ्यावर केक लावला म्हणून तिघांना संपवलं..

UP Triple Murder Case

Triple Murder Over Cake Incident : उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहर खुर्जा भागातील तिहेरी हत्याकांडाची थरारक आणि धक्कादायक घटनेनं संपर्ण देश हादरून गेला आहे. सुभाष रोडवरील एका जिममध्ये वाढदिवसाची पार्टी सुरू होती… हशा, मस्करी, आणि मित्रांचा जल्लोष… पण काही क्षणांतच हे वातावरण बदललं आणि आनंदाच्या जागी गोळ्यांचा आवाज घुमला…

सुरुवात झाली अगदी किरकोळ कारणाने… चेहऱ्यावर केक फासण्यावरून… होय, एका साध्या विनोदाने… दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला… हा वाद इतका वाढला की, त्याचे रूपांतर हाणामारीत झालं… आणि मग अचानक… गोळीबार सुरू झाला… या गोळीबारात मनीष, अमरदीप आणि आकाश या तिघांचा मृत्यू झाला… तिन्ही जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं… पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं…

हेही वाचा – मीरारोडमध्ये चाकूहल्ल्याने खळबळ; ISIS संदर्भातील नोटमुळे तपास ATSकडे, दहशतवादी हल्ल्याचा संशय

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली… पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले… आणि तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली…आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे… तर सात आरोपी अद्याप फरार आहेत… आरोपींच्या शोधासाठी उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये छापेमारी सुरू आहे…

मोबाईल फोन जप्त करून तांत्रिक तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळावरील सुमारे ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले… तसेच उपस्थित लोकांचे मोबाईल फोन जप्त करून तांत्रिक तपास सुरू केला आहे… कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग… या सर्व माध्यमांतून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे…पण या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे… आरोपी आणि मृत यांचं नातं…मुख्य आरोपी मयंक सैनी… हा मृत मनीषचा जवळचा मित्र होता… दोघेही एकमेकांच्या घरी येत-जात असत… एकत्र जेवणं… एकत्र वेळ घालवणं… इतकं जवळचं नातं…

राग अन् आक्रमकता एका क्षणात उफाळून आली

मग प्रश्न उभा राहतो… अशी मैत्री रक्तरंजित वैरात कशी बदलली? इतकंच नाही… दुसरा आरोपी जीतू आणि मृत अमरदीप हे देखील नातेवाईक होते… म्हणजेच… या घटनेत शत्रू नव्हतेच… तर जवळचे मित्र आणि नातेवाईक एकमेकांचे जीव घेत होते…तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली… आरोपी मयंक आणि जीतू यांच्यावर याआधीही गुन्हे दाखल होते… रोड रेज आणि हल्ल्याच्या घटनांमध्ये त्यांची नावे आली होती…म्हणजेच… हा राग, ही आक्रमकता… आधीपासूनच त्यांच्या स्वभावात होती का?… आणि त्या एका क्षणाच्या वादाने ती उफाळून आली का?… हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे…

दरम्यान, मृत मनीष आणि आकाश हे सामाजिक कार्यात सक्रिय होते… गोसंरक्षण मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता… त्यामुळे परिसरात त्यांची चांगली ओळख आणि मान होता…या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप आणि दु:ख आहे… अंत्यविधीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे २०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते…

एक साधा विनोद… एक क्षणाचा राग… आणि तीन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त…बुलंदशहर तिहेरी हत्याकांड हा फक्त एक गुन्हा नाही… तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे… की क्षणिक राग आणि हिंसा… किती भयानक परिणाम घडवू शकते…तपास सुरू आहेत, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे…ही घटना… मैत्री, विश्वास आणि मानवी नात्यांवर कायमचा डाग ठरली आहे…

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts