Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • राहुरीत थरारक हत्या उघड; पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट, प्रियकर अटकेत
गुन्हा

राहुरीत थरारक हत्या उघड; पत्नीनेच रचला पतीच्या खुनाचा कट, प्रियकर अटकेत

Rahuri Murder Case

Rahuri Murder Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये थरारक आणि खळबळजनक हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या काही तासांत राहुरी पोलिसांनी चित्रपटाला शोभेल असा तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अनैतिक संबंधातून काढला काटा

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सुधाकर किसन थोरात (वय ४०) हा नेवासा तालुक्यातील भेंडा येथे पत्नीसमवेत हॉटेलवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. याच काळात त्याच्या पत्नीचे ज्ञानदेव सागर (वय ३८) याच्याशी अनैतिक संबंध जुळले. पती वारंवार अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला.

हे ही वाचाकोपरगावात वाळू माफियांचा उच्छाद; तहसील पथकावर हल्ला, मोबाईल हिसकावला

कसा रचला कट

राहुरी फॅक्टरी परिसरातील एका लॉजमध्ये मुक्काम करत हत्येचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानदेव सागर याने सुधाकरला दारू पाजून निर्जनस्थळी नेले आणि गळा दाबून निर्घृण हत्या केली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी पत्नी अनिता थोरात व प्रियकर ज्ञानदेव सागर यांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या खुनामुळे राहुरीसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, राजु जाधव, पो.हे.राहुल यादव, संभाजी बडे, शकुर सय्यद, गणेश लिपणे, इपथेकार सय्यद आदिंच्या पोलीस पथकाने ही कामगिरी केली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts