पुण्यात शिवसेना (बाळासाहेब उद्धव ठाकरे) पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना महिला आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाली. चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. निष्त्कि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर एक महिला असूनही आत्महत्याग्रस्त महिलेचा अवमान करणाऱ्या चाकणकरांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा त्यांच्याकडून देण्यात आल्या.
दरम्यान, आज दुपारी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी आक्रमत होत थेट रुपाली पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महिलांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर होते. राजीनामा द्या.. राजीनामा द्या.. रुपाली चाकणकर राजीनामा द्या.. अशा घोषणा त्यांच्याकडून देत आहेत. महिला आघाडीने चाकणकर यांच्या धायरी येथील संपर्क कार्यालयासमोर हे आंदोलन केले. चाकणकर यांच्या समर्थक महिलांनी त्यांना जोरदार विरोध केला, त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढण्यात आला.
हे ही वाचा – तरुणीनं रागाच्या भरात एसी ट्रेनची खिडकी फोडली; तिच्यावर कारवाई होणार?
चाकणकरांच्या ‘याच’ वक्तव्याने वाद पेटला..
रूपाली चाकणकर यांनी 27 ऑक्टोबर रोजी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. “मी सर्व डॉक्टर,अधिकारी यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर युवतीने आयसी कमिटीकडे तक्रार केली नव्हती. मात्र पोलिस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी होत्या. आरोपींच्या बाबतीत फिट आणि अनफिट रिपोर्ट देण्यावरून तक्रारी होत्या. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने तीन वेळा बदलीच्या बाबतीत विचारणा होऊन देखील फलटणमध्येच थांबण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी विशेष ऑर्डर करून बदली थांबवण्यात आली,” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या..
“महिला आयोग मृत मुलीच्या सीडीआर बद्दल बोलता. मग निंबाळकर नाईकांचे सीडीआरही खुले करा,” अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे. “राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे खुलासा मागितला पाहिजे मृत तरूणीच्या हातावर लिहलेले हस्ताक्षर आणि त्यांचे चार पानी पत्रातील हस्ताक्षर जुळत नाही. पत्रातील निरीक्षक हा शब्द नऊ वेळा आला आहे. यातील निरीक्षक मधील वेलांटी दुसरी आहे व हातातील निरिक्षक या शब्दात वेलांटी पहिली आहे. हस्ताक्षरही जुळत नाही. महिला आयोग सुपारी वाजविण्यासाठी येतंय का? कुणाला वाचविण्याचा प्रयत्न होतोय?” असा सवाल अंधारेंनी विचारला आहे.
काय म्हणल्या तृप्ती देसाई..
“रुपालीताई तुम्हाला हे शोभत नाही. महिला आयोग जे काम करत याच सिरीयसनेस तुमच्याकडे नाही. रूपाली चाकणकर तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात की राजकारण्यांच्या प्रवक्त्या आहात? महिला डॉक्टरानी आत्महत्या केली की तिची हत्या झाली आणि तिला आत्महत्या करायला कोणी प्रवृत्त केलं यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. राज्य महिला आयोगाने डॉक्टर महिलेलाच आरोपी करण्याचा प्रयत्न केला. जे आरोपी अटकेत आहे ज्यांच्यावरती आरोप आहेत त्या आरोपींना वाचवण्यासाठी डॉक्टर महिलेवर आरोप केले मेल्यावर देखील तुम्ही एका महिलेला सोडत नाही,” असं तृप्ती देसाई म्हणाल्या
महिला आयोगाचे म्हणणे पक्षाचे नाही; अजित पवार
महिला आयोगाचे म्हणणे हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही, तसेच या घटनेतील ज्यांची ज्यांची नावे समोर येत आहेत, त्यांना एकालाही सोडले जाणार नाही आणि मी लवकरच भेटायला येणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांना फोनवरून धीर दिला.












