Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सोलापूरात तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराची हत्या, तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बेड्या
Top News

सोलापूरात तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराची हत्या, तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बेड्या

Transgender Murder Case Solapur

solapur transgender candidate murdered : राज्यात सध्या महापालिका निवडणूकीची धामधूम सुरू आहे. असे असताना सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंधी उमेदवाराची हत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या हत्या प्रकरणात एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सोलापूर पोलीसांनी हत्येच्या काही तासांत आरोपांनी बेड्या ठोकल्या आहेत. अय्युब सय्यद असे या तृतियपंथी याचे नाव आहे.

हेही वाचा – पहिला नंबर! मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस-वंचित आघाडी, अन् जागावाटपाची यादी जाहीर

तृतीयपंथी अय्युब सय्यद याला सोलापूर महापालिका निवडणूकीत उभे राहायचे होते. सोलापूर महापालिका निवडणूकीत इच्छुक असलेल्या तृतीयपंथी अय्युब सय्यद याची हत्या झाली होती. अय्युबचे मारेकरी हे विद्यार्थी होते. त्यातील एक आरोपी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे तर इतर दोन विद्यार्थी देखील महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा सोलापूर पोलीस कसून तपास करत आहेत.

अय्युब हा श्रीमंत असल्याचे आणि त्याच्याकडे असलेल्या पैशामुळे जवळच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे समोर समोर आले आहे. त्याच्या अंगावरील सोने, रोकडं, मोबाईल, गाडी घेऊन आरोपी फरार झाले होते. त्यांनी चोरीच्या उद्देश्याने तृतीयपंथी अय्युबची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात यशराज कांबळे, आफताब शेख, वैभव पनगुले अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. हत्येनंतर अवघ्या 6 तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी वैभव पनगुले हा इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री आरोपी यशराज कांबळे अय्युब सय्यद सोबत त्याच्या घरी आला होता. त्यानंतर काही वेळाने आरोपी आफताब शेख आणि वैभव पनगुले हे देखील अय्युबच्या घरात दाखल झाले. काही वेळाने तिन्ही आरोपींनी उशीने तोंड दाबून अय्युब सय्यद याची हत्या केली. त्याच्याजवळ असलेले दागिने, रोकड आणि गाडी घेऊन ते पसार झाले. सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले दागिने, व मुद्देमाल जप्त केला आहे. अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक होते.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts