Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर कार जळून खाक; मानवी कवटी आढळल्याने खळबळ
गुन्हा

टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर कार जळून खाक; मानवी कवटी आढळल्याने खळबळ

Burnt car and police investigation on Tekwada Khamkheda road after human skull found

Burnt car found on Tekwada Khamkheda road : टेकवाडा खामखेडा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघतामुळे परिसरात खळबळ उडाली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कार पूर्णपणे जळाली आणि गाडीत मानवी हाडे आणि कवटी आढळून आली.

पहाटेच्या 4 वाजेच्या सुमारास टेकवाडा खामखेडा रस्त्यावर चंद्रकांत प्रताप धनगर यांच्या मालकीची मारुती सुझुकी कार रस्त्यावर पूर्णतः जळून खाक झाल्याचे दिसले. आणि या गाडीत मानवी हाडे आणि कवटी आढळून आली. चंद्रकांत धनगर हे काही वर्षापासून सुरत येथे वास्तव्यास होते. ते आपल्या मुळगावी खामखेडा येथे वडील व भावाला भेटण्यासाठी येणार होते. घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळी त्यांनी आपल्या भावाला तीन ते चार वेळा फोन करून “मी घरी येतोय” असे सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

कुठे घडली घटना

टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर बन्सीलाल दगडू पाटील यांच्या शेताजवळ पहाटे गहूच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यावेळी या आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता रस्त्यावर उभी असलेली कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसली. काही वेळातच आगीने उग्ररूप धारण केल्याने जवळ जाणे शक्य झाले नाही. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेचे वृत्त समजताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मानवी हाडे व कवटी आढळून आली. त्यामुळे हा अपघात की अन्य काही, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

हे ही वाचा : सावकारने कर्जापोटी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी, संताप येणारी घटना..

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली असून नमुने गोळा करून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच जळालेल्या वाहनाची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी आले होते. वाहनात आग कशी लागली, स्फोट कशामुळे झाला, याचा तपास विविध अंगाने केला जात आहे.

अपघात कि घातपात

दरम्यान, मृत्यू हा अपघाती नसून घातपाताचा असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. चंद्रकांत धनगर यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी किशोर प्रताप धनगर (मोठा भाऊ) यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत असून फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts