Unknown youth murder case : मुरली बंधाराच्या परिसरात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका अज्ञात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बिटारगाव पोलीस ठाण्याअंतर्गत या प्रकरणाचा तपस करण्यात येत असून साधारणता आठवड्याभरापूर्वी ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात फेकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : रत्नागिरी गावडे आंबेरे बिर्जेवाडीत मुलावर बिबट्याचा हल्ला; १५ वर्षीय मुलगा जखमी
काय आहे प्रकरण
सकाळच्या सुमारास काही नागरिक मुरली बंधाऱ्याच्या बाजूने जात असताना त्यांना तीव्र दुर्गंधी आली त्यावेळी त्यांनी बधाराकडे पहिले असता पाण्याजवळ एक पोत्यात दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला दिसला त्यावेळी नागरिकांनी तातडीने ही माहिती बिटरगाव पोलिसांना दिली त्यावरून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे वय अंदाजे 30 ते 32 वर्ष असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात फेकला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.











