Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; आरोपीमध्ये ASI अधिकाऱ्याचा समावेश
Top News

ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; आरोपीमध्ये ASI अधिकाऱ्याचा समावेश

Youth's suicide

Youth’s suicide : बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पुण्यातील खडकवासला येथील तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एका आरोपी तरुणीचे वडील हे पुणे शहरात पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर कार्यरत असल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मयत विक्रम उर्फ बबलु नवनाथ कोळपे (वय 23, रा. बयाजीनगर, रुई, ता. बारामती, जि. पुणे) याने दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 7.45 या वेळेत आपल्या राहत्या घरातील किचनरूममध्ये स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा – प्राचार्यांच्या मारहाणीने व्यथित विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप

घटनेनंतर त्यास तातडीने रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये विक्रमने एका तरुणीमुळे गेल्या पाच वर्षांपासून मानसिक छळ, धमक्या व ब्लॅकमेलिंगला सामोरे जावे लागत असल्याचा उल्लेख केला आहे. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आपला भावनिक व आर्थिक वापर करण्यात आला, तसेच फोटो व चॅटिंगच्या आधारे धमकावण्यात आल्याचेही त्याने नमूद केले आहे.

मोबाईलमधील फोटो व चॅट्स जबरदस्तीने डिलीट केले

मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, संबंधित तरुणी, तिची बहीण व वडील यांनी विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो व चॅट्स जबरदस्तीने डिलीट केले तसेच त्याला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. विशेष बाब म्हणजे, आरोपी तरुणीचे वडील हे पुणे येथे api म्हणून कार्यरत असून, त्यांनीही फोनवरून दमदाटी व धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या बाबींची प्रथमदर्शनी माहिती तपासात समोर येत आहे.

बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हे दाखल

या संपूर्ण प्रकरणात बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात सृष्टी विकास मते,श्रृती विकास मते व विकास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108, 351(2), 351(3), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणीचे वडील हे पोलीस अधिकारी असल्याने त्यांना अटक होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts