Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

“भारताने घेतला फायदा, आता आम्ही कमावतो; तरीही डील करणार” – ट्रम्प

Donald Trump K

Donald Trump: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत- अमेरिका व्यापार संबंधाबाबत नुकतंच मोठे विधान केले आहे. जाणून घेऊयात काय बोले आहेत.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत- अमेरिका व्यापार संबंधाबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, अनेक वर्षांपासून भारताने अमेरिकेचा फायदा घेतला आणि अमेरिकन वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ) लावले. त्यांच्या मते, भारताने दीर्घकाळ अमेरिकेकडून फायदा मिळवला, तर अमेरिकेला त्याचा तितका लाभ झाला नाही.

मात्र, ट्रम्प यांनी सांगितले की आता परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या घडीला अमेरिका भारतासोबतच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळवत आहे. त्यामुळे व्यापारातील समीकरणे पूर्वीपेक्षा वेगळी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: आता ओला- उबेरला टक्कर? राज्यात ‘सहकार भारत’ टॅक्सी सेवा; मुंबईसह ‘या’ दोन शहरांत लवकरच सुरुवात

याचबरोबर त्यांनी भारतसोबत व्यापार करार होण्याची शक्यता देखील व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले की, “आम्ही भारतसोबत करार करणारच आहोत.” त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबधाचाही उल्लेख केला. मोदी हे आपले चांगले मित्र असून दोन्ही नेत्यांमध्ये चांगले समन्वय आणि परस्पर समज असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारत- अमेरिका व्यापार संबंधाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार करारबाबत वाटाघाटी सुरू असून काही मुद्द्यांवर अजूनही मतभेद आहेत. तरीही, दोन्ही देश परस्पर फायद्याचा करार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळत आहेत.

एकूणच, व्यापारात मतभेद असेल तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत राहण्याची आणि भविष्यात मोठा व्यापार करार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts