• Home
  • लाईफस्टाईल
  • एक दिवस बाकी! २ ऑक्टोबरला भारतात रिलीज होणार Doraemonचा नवा चित्रपट; नोबिता-डोरेमॉनची समुद्राखालील भन्नाट सफर
मनोरंजन

एक दिवस बाकी! २ ऑक्टोबरला भारतात रिलीज होणार Doraemonचा नवा चित्रपट; नोबिता-डोरेमॉनची समुद्राखालील भन्नाट सफर

Doraemon Movie 2026
89
Doraemon Movie 2026: Doraemonच्या चाहत्यांसाठी उत्सुकता वाढवणारी बातमी आहे. नोबिता आणि डोरेमॉनची नवी साहसी सफर २ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतात रिलीज होणार आहे.

९०च्या दशकात Doraemon पाहत मोठे झालात आणि आजही त्याचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक भन्नाट गुड न्यूज आहे. नोबिता, डोरेमॉन आणि त्यांच्या मित्रांची नवी साहसी सफर आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यावेळी ही टोळी थेट समुद्राच्या खोल पाण्यातील एका रहस्यमय किल्ल्याच्या शोधात जाणार आहे. गूढ रहस्य, खजिना, भन्नाट गॅजेट्स आणि भरपूर मजा घेऊन आलेला ‘Doraemon the Movie: New Nobita and the Castle of T’ हा नवा चित्रपट २ ऑक्टोबरला भारतात रिलीज होणार आहे.

हेही वाचा: सोन्याच्या दरात घसरण का होतेय? या 5 कारणांमुळे वाढला विक्रीचा दबाव

समुद्राच्या तळाशी सापडला रहस्यमय किल्ला

चित्रपटाच्या कथेत नोबिता आणि त्याचे मित्र एका गूढ समुद्राखालील किल्ल्यांपर्यंत पोहोचतात. या किल्ल्यामध्ये अनेक रहस्ये आणि मौल्यवान खजिना लपलेला असल्याचे समोर येते.

या रहस्यांचा शोध घेताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. अर्थातच, या संपूर्ण मोहिमेत डोरेमॉनची भन्नाट गॅजेट्स त्यांना मोठी मदत करणार आहेत. ( LS Marathi News Channel )

डोरेमॉनच्या गॅजेट्समुळे साहस आणखी रंगणार

डोरेमॉनची भन्नाट गॅजेट्स (Doraemon Movie 2026: ‘New Nobita and the Castle of T’ ) ही त्याच्या प्रत्येक साहसाची खासियत असते. यावेळीही समुद्राच्या खोल पाण्यातील या मोहिमेत गॅजेट्सची महत्त्वाची भूमिका असणार आहे. नोबिता आणि त्याचे मित्र समुद्राच्या अद्भुत विश्वात प्रवेश करताना विनोद, थरार आणि कल्पनाशक्तीचा भन्नाट अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

मैत्री आणि टीमवर्कचीही खास झलक

या साहसी प्रवासात केवळ रहस्य आणि खजिनाच नाही, तर मित्रांमधील एकजूट आणि टीमवर्कही पाहायला मिळणार आहे. कठीण प्रसंगातून मार्ग काढताना नोबिता आणि त्याचे मित्र एकमेकांना कशी साथ देतात, हे चित्रपटाच्या कथेत महत्त्वाचं ठरणार आहे. (Doraemon Kids Movie)

किती भाषेत रिलीज होणार आहे?

‘Doraemon the Movie: New Nobita and the Castle of T’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. चित्रपटाला U सेन्सॉर रेटिंग मिळाले आहे.

लहान मुलांसोबतच डोरेमॉनच्या जुन्या चाहत्यांसाठीही हा चित्रपट (Doraemon India Release) एक नवी साहसी सफर ठरणार आहे. आता नोबिता आणि डोरेमॉन समुद्राखालील या गूढ किल्ल्यात कोणतं रहस्य शोधतात आणि खजिन्यापर्यंत कसे पोहोचतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts