Breaking News :
  • Home
  • Top News
  • सैफ-कियारा पहिल्यांदाच एकत्र; सुपरनॅचरल चित्रपटात दिसणार!
मनोरंजन

सैफ-कियारा पहिल्यांदाच एकत्र; सुपरनॅचरल चित्रपटात दिसणार!

Saif Ali Khan And Kiara Advani
37
Saif Ali Khan And Kiara Advani: कियारा अडवाणी लवकरच तिच्या आगामी “टॉक्सिक” चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती पहिल्यांदाच सैफ अली खान सोबत स्क्रीन शेअरिंग करणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी (Saif Kiara upcoming movie) चित्रपटांमुळे चर्चेत आहे. लवकरच ती “टॉक्सिक” या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कियारा नाडियाची भूमिका साकारत असून, तिच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अशातच कियाराच्या आगामी प्रोजेक्टबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी आणि अभिनेता सैफ अली खान लवकरच एका इंटेन्स सुपरनॅचरल चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसू शकतात. या दोन्ही कलाकारांची जोडी यापूर्वी कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे या नव्या प्रोजेक्टची चर्चा सुरू होताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटकडून केली जाणार असल्याचे समजते. सुपरनॅचरल विषयावर आधारित हा चित्रपट कथानक आणि मांडणीच्या दृष्टीने वेगळा असण्याची शक्यता आहे. सैफ आणि कियारासारखे दोन लोकप्रिय कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याने हा प्रोजेक्ट विशेष ठरण्याची शक्यता आहे. (LS Marathi News Channel)

रिपोर्टनुसार, निर्माते हा चित्रपट याच वर्षी फ्लोअरवर घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम झाल्यानंतरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे सध्या या प्रोजेक्टबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, कियाराच्या ‘टॉक्सिक’नंतर तिच्या या नव्या चित्रपटाकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, सैफ अली खानही वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या नव्या सुपरनॅचरल चित्रपटात दोघांची केमिस्ट्री आणि अभिनय कसा पाहायला मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts