Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटनं प्रवाशाला मारहाण करुन केलं रक्तबंबाळ; आरोपी निलंबित
ताज्या बातम्या

एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटनं प्रवाशाला मारहाण करुन केलं रक्तबंबाळ; आरोपी निलंबित

नवी दिल्ली : शुक्रवारी दिल्ली विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटनं एका प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एअरलाइन्सनं चौकशीचे आदेश दिले आहेत आणि आरोपी पायलटला निलंबित केलं आहे. घटनेच्या वेळी पायलट ड्युटीवर नव्हता, असं सूत्रांनी सांगितलं.

प्रवाशाच्या चेहऱ्यावर रक्त :

प्रवाशानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ही घटना शेअर केली, ज्यामध्ये भांडणानंतर त्याच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होतं. त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पायलटचा फोटो देखील शेअर केला. याप्रकरणी एअरलाइन्सनं एका निवेदनात म्हटलं आहे की त्यांना दिल्ली विमानतळावर झालेल्या एका घटनेची माहिती आहे ज्यामध्ये दुसऱ्या एअरलाइन्समध्ये प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या त्यांच्या एका कर्मचाऱ्यानं दुसऱ्या प्रवाशाशी वाद घातला होता.

पायलट तात्काळ निलंबित :

एअरलाइन्सनं म्हटलं आहे की, “आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो. संबंधित कर्मचाऱ्याला चौकशी होईपर्यंत तात्काळ अधिकृत कर्तव्यावरुन काढून टाकण्यात आलं आहे.” चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित योग्य शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. प्रवासी अंकित दिवाण यांनी सांगितलं की, एअर इंडिया एक्सप्रेसचे कॅप्टन वीरेंद्र सेजवाल यांनी दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर त्यांच्यावर हल्ला केला. दिवाण म्हणाले की, त्यांच्या सात वर्षांच्या मुलीनं हा हल्ला पाहिला आहे आणि ती अजूनही मानसिक आघातानं ग्रस्त आणि घाबरलेली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts