• Home
  • राजकारण
  • जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल… आम्ही त्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
Top News

जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल… आम्ही त्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबईत भाड्यानं घर शोधणं होईल सोपं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय

Devendra Fadnavis on NCP decision : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुंबईहून बारामती जात असताना विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रासह राजकीय वर्तुळात हालहाल निर्माण झाली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. अजित पवार यांच्या जाण्याने अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाती आमदारांची बैठक पार पडणार आहे. तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. यासंदर्भात आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रेझेंट केलं जातंय

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू – सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून. त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की, अजित दादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील, त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडून असेल…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही तसा प्रस्ताव वगैरे आला का?

राष्ट्रवादीचे नेते माझ्यासोबत दोन वेळा चर्चा करून गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय ऑप्शन्स आहेत, या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही.”

हे ही वाचाशरद पवारांना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची कल्पनाही नाही? पत्रकार परिषदेत केले स्पष्ट

शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे का ? अर्थसंकल्प कोण सादर करणार ?

अर्थसंकल्पाबाबत विचारले असता ते म्हणाले कि, “आता तरी असं आहे की, अजित दादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे. आणि मग ठरवू काय करायचं ते.”

नितीन गडकरी हे आमचे नेते आणि मार्गदर्शक आहेत. त्यामुळे आता ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे. चर्चेनुसार त्या संदर्भातली एक रूपरेषा ही ठरवण्यात आलेली आहे. जी काही नावं आहेत, त्या नावांच्या संदर्भात काही निर्णय जे आहेत ते उद्या किंवा परवा घेतले जातील. आणि जी काही रूपरेषा ठरली आहे, त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील. आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत हे मिळून त्या संदर्भात अंतिम निर्णय करती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts