Ajinkya DY Patil University Doctorate Awards : अजिंक्य डी. वाय. पाटील पुणे, विद्यापीठाने क्रिकेटर हिटमॅन रोहित शर्मा आणि पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकडा मुंडे यांच्यासह सहा जणाांना मानद डाक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा १० दीक्षांत समारंभ एडीवायपीयू कॅम्पस, डी.वाय. पाटील नॉलेज सिटी, चऱ्होली, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यालाही मानद डॉक्टरेट (डी. लिट.) प्रदान करण्यात आली.
हेही वाचा – जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी भाजपचा बिनविरोध पॅटर्न सुरू, एका जिल्ह्यात ८ उमेदवार विजयी
‘माझ्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने यावेळी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी ‘मानद डॉक्टरेट’ देऊन माझा सन्मान केला. कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे उच्च शिक्षणाचे माझे स्वप्न मी मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवले होते. परंतु, माझ्या कष्टांची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेतली गेली. मी डाॅ. अजिक्य पाटील आणि विद्यापीठाचे मनापासून आभार मानते,; असं मुंडे म्हणाल्या.
‘या’ सहा जणांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मान
रोहित शर्मा ( क्रिकेट ), उज्जैनचे आदरणीय गुरुजी प्रमोद शर्मा ( सेवा ), मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे ( सामाजिक कार्य ),सनातन धर्म फाऊंडेशनचे संस्थापक सुदेश अग्रवाल ( सांस्कृतिक ), गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष रेशेश भन्साळी (औद्योगिक नेतृत्व ), सामाजिक उद्योजक, तंत्रज्ञ आणि धोरणात्मक सल्लागार मनोज पोचट (उद्योग ) आदींना मानद डॉक्टरेट देऊन सन्मान करण्यात आला.
आनंदी करायचं असेल तर पॉझिटिव्ह राहायला शिका – पंकडा मुंडे
‘मी मराठीत बोलु का.? मातृभाषा का राष्ट्रभाषा ? ज्यांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांची भाषा. कुठल्या भाषेत बोलू चला मी खिचडीत बोलते. मला पीएचडीची खूप इच्छा होती आणि त्याच वेळेस मला पीएचडी मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रात मला पीएचडी मिळाली आहे. त्या पुढे म्हणाल्या की,’ जे तुम्हाला बनायचं ते बना. पण लोकांनी जसं तुम्हाला ट्रीट करावं वाटतं, तसं तुम्ही बना. पैसे कमवल्याने आपला इगो सॅटिस्फाय होतो. पण आनंद व्यक्ती बना. आनंदी व्यक्ती बनवायचं असेल आणि आनंदी करायचं असेल तर पॉझिटिव्ह राहायला शिका,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.












