Ashok Kharat exploitation case 2000 women : राज्यभर अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत आहे. खरात याच्या जवळच्या व्यक्तीनेच हे प्रकरण उघडकीस आणल्याचे समोर आले. दररोज नवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती या प्रकरणी समोर येत आहे. जवळपास 2000 महिलांचे खरातने शोषन केल्याची धक्कादायक माहीती समोर आहे.
उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण
खरातचे धार्मिक विधी आणि उपासनेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर येतायत. खरात धार्मिक विधींचा बहाणा करून महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे या तक्रारींतून समोर आलय.ईशान्येश्र्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह फार्महाऊस कर्मचारी आणि आठ जणांची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने एसआयटी विशेष तपास पथकाची स्थापन केलीय. पोलिसांनी चोप दिल्या नंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
गर्भवती महिलेवर चांगल्या संततीसाठी पूजा
काही गंभीर प्रकरणांवर नजर टाकली तर नुकतच सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चांगल्या संततीसाठी पूजा गरजेची असल्याचे सांगत खरातने लैंगिक अत्याचार केला. अन्य एका विवाहितेवर बलात्कारानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा धक्कादायक खुसाला झाला. खरातचे रोज नवे कारनामे बाहेर येतायत. आरोपी महिलांना प्रसाद म्हणून पेढे आणि पाणी द्यायचा ते घेतल्यानंतर महिलांना चक्कर येऊन अर्धबेशुद्ध अवस्थेत जायचे. याच अवस्थेचा फायदा घेत आरोपीने महिलांवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकारांबद्दल कुणालाही सांगितल्यास तिचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करेल, महिलांची लग्न मोडतील किंवा तिच्या पतीला इजा पोहोचवेल अशा धमक्या तो देत असे.
मंतरलेले पाणी महिलांना पाजायचा
मी अवतारी पुरुष आहे, तू मागील जन्माची अप्सरा आहेस. असे सांगण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक केली. तिला दैवी शक्तीची भीती दाखवून वारंवार तिचं शारीरिक शोषण केल्याच उघड झालं. मीच तुझ्याशी लग्न करणार आहे, तुझे भविष्य सुधारायचे असेल तर माझं ऐकावं लागेल, नाहीतर तुझ्यावर कोप होईल, अश्या धमक्या द्यायचा. त्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या तांब्याच्या बाटलीतले मंतरलेले पाणी महिलांना पाजायचा आणि त्यांच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा.
तुझा घटस्फोट पुर्वीच ठरलेला आहे
मला त्रिकाल ज्ञान आहे, मी अवतारी पुरुष आहे, तुझा घटस्फोट पुर्वीच ठरलेला आहे आणि तू मागील जन्माची माझी अप्सरा आहेस. या जन्मात जर सुखाने राहायचं असेल तर माझ्यासहवासात तुला राहावं लागेल, असे सांगून त्याने महिलांसोबत अश्लील वर्तन केले. महिलेनी विरोध केला असता, तो भविष्याची भीती दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न करायचा.
धार्मिक विधींद्वारे तरुणींवर लैंगिक अत्याचार
लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली ओळख करून घेतल्यानंतर खरातने धार्मिक विधींचा आधार देत तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचं तक्रारीमध्ये नमुद केलंय. लग्न लवकर जुळावं आणि अडथळे दूर व्हावेत, यासाठी मंदिरात दान अर्पण करण्यास सांगत त्याने पैसेही घेतल्याचा आरोप आहे.लग्न जुळवून देण्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या या संपर्कात आरोपीने महिलेला विविध धार्मिक उपाय, ताईत आणि विधी करण्याचा सल्ला दिला.
तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान वापरायचा
या काळात या भामट्या खरातने लाख – लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचं सांगण्यात येतय. लग्नानंतरही आरोपीने आशीर्वाद, वैवाहिक आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी वारंवार महिलांना ऑफिसमध्ये बोलावायचा काही वेळेस नव्या जोडप्यालाही धार्मिक विधींसाठी बोलावण्यात आल्याच्या तक्रारी नोंद आहेत. खरात नकली साप आणि वाघ ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा. साप, वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करायचा. रिमोट कंट्रोलने सापाच्या आणि वाघाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करत होता. भोंदूबाबा खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान वापरायचा. सुगंधी कस्तुरी लोकांना देऊन फलप्राप्ती होते,अशा थापा मारत होता.
2000 महिलांवर अत्याचार केल्याचा अंदाज
दरम्यान, भोंदूबाबा खरात तांत्रिक विधीसाठी काही वन्य प्राण्यांचे अवयवही उपयोगात आणत असल्याच सांगण्यात येतंय. अश्या पद्धतीने संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकळण्याचा पॅटर्न तयार केला होता. आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून 2000 महिलांवर अत्याचार केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणी अटकेत असणाऱ्या भोंदू अशोक खरातने मागील काही वर्षात काय, काय उद्योग केले, याची कुंडलीच आता हळूहळू समोर येतीय..












