• Home
  • महाराष्ट्र
  • ढोंगीबाबा अशोक खरातची केली HIV टेस्ट; रिपोर्टमध्ये काय आलं समोर?
Top News

ढोंगीबाबा अशोक खरातची केली HIV टेस्ट; रिपोर्टमध्ये काय आलं समोर?

kharat 4

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदुबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांच्या अंधश्रद्धेचा गैरवापर करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच अशोक खरातने महिलांसोबत पुरूषांची देखील फसवणूक केली आहे. त्याने अनेक उद्योजकांना फसवत त्यांनी लाखो रूपयांची लूटमार केल्याचे देखील उघडकीस आले आहे. ढोंगीबाबा खरातने विवाहित महिला आणि तरूणींवर अत्याचार केला असून त्याचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. अशातच आता अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट (HIV Test) करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट समोर आला आहे.

हेही वाचा – खळबळजनक! ढोंगीबाबा अशोक खरातने पुरूषांनाही नाही सोडलं; रिंगण आखून केलं धक्कादायक कृत्य

अशोक खरातच्या एचआयव्ही टेस्टचा काय आला रिपोर्ट?

न्यायालयाने अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्याने अत्तापर्यंत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले असल्याचे उघड झाले आहे. तर याप्रकरणी आता खरातच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्याचा एचआयव्ही चाचणीचा रिपोर्ट देखील समोर आला आहे.

नाशिक पोलिसांनी ढोंगीबाबा अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट केली असून त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. अशोक खरातचा एचआयव्ही रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.

अशोक खरातला अटक केल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. या तपासात पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला असून या पेनड्राईव्हमध्ये 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. तर पोलिसांनी खरातच्या नाशिकमधील ओकस कार्यालयातही झाडाझडती केली. या तपासात पोलिसांनी तांब्याची एक बाटली, खडे, गंडे दोरे आणि काही महिलांचे केस जप्त केले आहेत. तसेच पोलिसांना त्याच्या कार्यालयात काही आर्थिक व्यवहारांची कागदपत्रेही मिळाली आहेत.

दरम्यान, अशोक खरातने महिलांसोबतच पुरूषांचीही मोठी फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. ढोंगीबाब अशोक खरात आता तब्बल 5 कोटींच्या खंडणीप्रकरणामध्ये अडचणीत आला आहे. अंधश्रद्धा, काळी जादू आणि मृत्यूची भीती या गोष्टींचा आधार घेत खरातने कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

खरातने ईशानेश्वर मंदिराच्या मागे एका बांधकाम व्यावसायिकाभोवती रिंगण आखून व्यावसायिकाला मृत्यूची भीती दाखवत त्याला अक्षरश: कैद करून ठेवलं होतं. त्यानंतर त्याच्यावर मानसिक दबाव आणत त्याला भीती, अंधश्रद्धा दाखवत त्याला तब्बल 5 कोटींचा गंडा घातल्याचा दावा तक्रारदार व्यावसायिकाने केला आहे. तसेच खरातने त्याच्या मिरगावमधील फार्महाऊसच्या बांधकामाचा खर्च आणि त्यातील फर्निचरचाही खर्च त्याने जबरदस्तीने वसूल केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts