Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भाजपकडून उद्धव ठाकरेंवर ३ लाख कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप
ताज्या बातम्या

भाजपकडून उद्धव ठाकरेंवर ३ लाख कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप

BJP allegation against Uddhav Thackeray corruption

BJP allegation against Uddhav Thackeray corruption : राज्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक होत आहे. या एकूण महापालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, ठाकरे गट, शिंदे गटाने पूर्ण तकाद लावली आहे. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा-तसा प्रचाराला वेग येत आहे. विशेष म्हणजे नेतेमंडळी आपल्या भाषणावेळी विरोधकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांना लक्ष्य केलं होतं. साटम यांना ठाकरे चाटम म्हणाले होते. आता याच अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांनी तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप साटम यांनी केला आहे.

सध्या राज्यातील निवडणुक प्रचार धार आल्याचे पाहायला मिळत. प्रचार शिगेला पोहोचलाय. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आज ठाकरे सेना आणि मनसेचा वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी ठाकरे बंधुंकडून भाजप-शिंदेगटार सडकून टीका करण्यात आली. त्यावर भाजपकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आलाय. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांच्या काळात ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप साटम यांनी केलाय. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आरोपांना धार मिळाल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा – ‘शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीम;’ प्रकाश आंबेडकरांची पवारांवर जहरी टीका

ठाकरे यांनी तीन लाख कोटींच घोटाळा केला – साटम

उद्धव ठाकरेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप साटम यांनी केला. मुंबई शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये 21 हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याची अवस्था बिकट आहे. हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाले आहे. कोरोना काळात महालक्ष्मी येथील कोव्हिड सेंटर हे बिल्डरच्या भल्यासाठीच उभारण्यात आले होते. बॉडी बॅग, पीपीई कीट असं काहीही त्यांनी सोडलं नाही, असा आरोप साटम यांनी केला. तसेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी 1700 बार रेस्टॉरंटकडून वसुली केली.

कोस्टल रोडचं सगळं श्रेय हे मुख्यमंत्री फडणवीस यांचं

उद्धव ठाकरे कोस्टल रोड आम्ही केला, असं म्हणत आहेत. परंतु त्यांच्या काळात हा रोड तयार करण्यासाठी तारखा ठरत नव्हत्या. कोस्टल रोडचं सगळं श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असा दावा करत साटम यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांनी 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा असा गंभीर आरोप केला. त्यामुळे आता साटम यांच्या आरोपांना ठाकरेंची शिवसेना कसं उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून साटम यांच्या चाटम असा उल्लेख

अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाकरेंनी साटम यांचा उल्लेख चाटम असा केला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली. त्यांनी प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. मी सामान्य कुटूंबातून आलेलो आहे. कोणाच्या आशीर्वादाने आलो नाही, असा टोला साटम यांनी लगावला.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts