Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

जळगावात सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी टळली

Jalgaon Cylinder Explosion

Cylinder explosion in Jalgaon : जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील शनी मंदिराजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या अपघातात घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही सर्वात मोठी समाधानाची बाब ठरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनीपेठ भागात नरेश देवरे यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घरामध्ये सुशांत घोष हे भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. सुशांत घोष यांच्या घरात अचानक घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला.

या घटनेमुळे घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्फोटामुळे घराच्या भिंतींना मोठे तडे गेले असून खिडक्यांच्या काचा फुटून सर्वत्र विखुरल्या गेल्या. घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कपडे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, स्फोट झाला तेव्हा घरातील व्यक्ती सुरक्षित अंतरावर असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.

तत्परता घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि आग अधिक पसरण्यापासून रोखली. स्थानिक नागरिकांनीही तातडीने मदतीसाठी धाव घेतली होती. सिलेंडर नेमका कशामुळे फाटला, याचे तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा पुढील तपास स्थानिक प्रशासन आणि पोलीस करत आहेत.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts