• Home
  • मनोरंजन
  • ‘डोरेमॉन’मागचा मास्टरमाइंड काळाच्या पडद्याआड; दिग्दर्शक त्सुतोमू शिबायामा यांचं निधन, अॅनिमेशन विश्वाला मोठा धक्का
Top News

‘डोरेमॉन’मागचा मास्टरमाइंड काळाच्या पडद्याआड; दिग्दर्शक त्सुतोमू शिबायामा यांचं निधन, अॅनिमेशन विश्वाला मोठा धक्का

doremon director

Doremon Director Tsutomu Shibayama Dies | अॅनिमनेशन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कारण प्रसिद्ध ज्येष्ठ अॅनिमेशन दिग्दर्शक त्सुतोमू शिबायामा (Tsutomu Shibayama) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्सुतोमू शिबायामा यांनी सर्वांचा आवडता ‘डोरेमॉन’ (Doremon) हा अॅनिमे दिग्दर्शित केला होता. त्यांनी तयार केलेला डोरेमॉन आज लहाणांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा अॅनिमे आहे.

हेही वाचा – इराणला पुन्हा मोठा धक्का! हवाई हल्ल्यात गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब ठार; इस्त्रायलने सांगितलं हल्ल्यामागचं कारण

दिग्दर्शक त्सुतोमू शिबायामा यांच्या निधनानं अॅनिमनेशन विश्वाला मोठा धक्का

त्सुतोमू शिबायामा यांच्या मृत्यूबाबतची माहिती अॅनिमेशन स्टुडिओने दिली आहे. जपानच्या ‘एशिया डो अॅनिमेशन वर्क्स’ या अॅनिमेशन स्टुडिओने त्सुतोमू शिबायामा यांच्या निधनाची अधिकृत माहिती आपल्या वेबसाइटवर पोस्ट शेअर करत दिली आहे.

‘एशिया डो अॅनिमेशन वर्क्स’ या अॅनिमेशन स्टुडिओने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “माझी सीईओ त्सुतोमू शिबायामा यांचं निधन झालं आहे. त्सुतोमू शिबायामा यांनी 20 वर्षांहून अधिक काळ कार्टून चित्रपटांचे दिग्दर्शन आणि डोरेमॉनच्या टीव्ही अॅनिमेशन करत अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांनी ‘निंतामा रानतारो’ या टीव्ही अॅनिमेशनचे देखील दिग्दर्शन केले होते. तर त्यांच्या या आजीवन योगदानाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या सन्मानार्थ आम्ही ही दु:खद बातमी प्रसिद्ध करीत आहोत.”

शिबायामा यांनी डोरेमॉनसह नोबिता अन् शिझुका या पात्रांची केलेली निर्मिती

त्सुतोमू शिबायामा हे जपानी अॅनिमेशनमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. शिबायामा हे लोकप्रिय ‘डोरेमॉन’ या टीव्ही ॲनिमे मालिकेचे मुख्य दिग्दर्शक होते. त्यांनी डोरेमॉन: नोबिता इन द वन-नान स्पेसटाइम ओडिसी’, ‘नोबिता अँड द कॅसल अंडरसी डेव्हिल’ यांसारख्या अनेक ॲनिमे चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे.

शिबायामा यांनी मागील 20 वर्षांमध्ये टीव्ही अॅनिमेचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत 22 डोरेमॉन चित्रपटांचे दिग्दर्शन केल आहे. त्यांनी अॅनिमेशनमध्ये 1963 साली आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. तर त्यांनी डोरेमॉनसह नोबिता आणि शिझुका या पात्रांची निर्मिती करत त्यांना खूप लोकप्रिय केले आहे. तसेच शिबायामा यांनी निनतामा रंतारो, चिबी मारुको, काकेसू झोरोरी आणि माझिमे नी फुमाजिमे यांचेही दिग्दर्शन केले आहे.

2012 मध्ये शिबायामा यांना जपानी एजन्सी फॉर कल्चरल अफेयर्सद्वारे ॲनिम उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, शिबायामा यांच्या मृत्यूची बातमी कळताच डोरेमॉनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts