• Home
  • ताज्या बातम्या
  • महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३५ वा जयंती महोत्सव; भव्यदिव्य स्वरूपात होणार साजरा!
ताज्या बातम्या

महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३५ वा जयंती महोत्सव; भव्यदिव्य स्वरूपात होणार साजरा!

Mahad News 1

Dr. Babasaheb Ambedkar 135th Birth Anniversary in Mahad: महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. मिरवणूक, जाहीर सभा आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा विशेष ठरणार आहे.

महाड (प्रतिनिधी)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jaynti 2026) यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. जयंती उत्सव समितीच्या वतीने या भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून, हजारो नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

आणखी वाचा: सोलापूरचा डंका जगभरात! एमपीएससीत विजय लामकाने राज्यात पहिला, तर आरती जाधव महिलांमध्ये प्रथम

दिवसाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने

उत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहणाने होणार आहे. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. आंबेडकरांना मानवंदना दिली जाईल. त्यानंतर पूजाविधी पार पडतील.

भव्य मिरवणूक ठरणार मुख्य आकर्षण

उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेली भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता भीमनगर येथून निघणार आहे. ही मिरवणूक रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, मोठ्या संख्येने भीम अनुयायी यात सहभागी होणार आहेत.

भोजनदान आणि सत्कार समारंभ

मिरवणुकीनंतर रात्री ८ ते ९ या वेळेत भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ होणार आहे.

जाहीर सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम

रात्री ९.३० वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, यात डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर भाष्य केले जाणार आहे. त्यानंतर रात्री १०.३० वाजता प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमात नांदेडचे गायक रविराज भद्रे आणि बुलढाण्याच्या गायिका आशा चरवे यांच्यात कव्वालीचा सामना रंगणार आहे. गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा इतिहास आणि विचार मांडले जाणार आहेत.

नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

महाड (Mahad) तालुक्यातील हा जयंती सोहळा विशेष मानला जातो. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी तालुका आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान, या सोहळ्यानिमित्त प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधांचीही तयारी करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts