Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • युद्धाचा भडका आणि बाजारात उसळी! सोन्या-चांदीचे दर कडाडले, सोने 11 हजारांनी महाग तर चांदी…
Top News

युद्धाचा भडका आणि बाजारात उसळी! सोन्या-चांदीचे दर कडाडले, सोने 11 हजारांनी महाग तर चांदी…

Gold and silver prices increased | सध्या अमेरिका-इस्त्रायल (America-Israeel) आणि इराण या देशांमध्ये युद्धाचा वणवा पेटला आहे. अमेरिका-इस्त्रायल (America-Israel) या दोन देशांनी मिळून इराणवर (Iran) हल्ला करत युद्ध (War) पेटवलं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक होत हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. इराणनेही दोन्ही देशांवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. इराणने दुबईवर (Dubai) क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तर पेटलेल्या या युद्धाचा फटका देशांसोबतच आता बाजारालाही बसला आहे.

हेही वाचा –  पाकिस्तानात तणावाचा स्फोट!अमेरिकन दूतावासावर हल्ला, 10 जण ठार

युद्धामुळे सोन्या-चांदीचे दर कडाडले

एकिकडे अमेरिका-इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यामुळे युद्धाचा फडका उडाला असून या युद्धामुळे बाजारात उसळी आली आहे. या युद्धामुळे सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) कडाडले आहेत. सोने 11 हजारांनी महाग झाले आहे तर चांदी 3 लाखांनी वाढली आहे.

युद्ध अजून लांबलं तर सोन्याचे – चांदीचे दर आणखी वाढणार

सोन्याच्या दरात अकरा रूपयांनी वाढ झाली असून आता ते 1,75,500 पर्यंत पोहोचले आहे. तर चांदीमध्ये दर 25,000 रूपयांनी वाढ होऊन ते 3 लाख 3 हजारांवर जाऊन पोहोचले आहे. सोन्या-चांदीची ही वाढ युद्ध पेटल्यानंतर झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच जर हे युद्ध अजून लांबले तर सोन्याचे आणि चांदीचे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts