Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • हेल्दी आणि पौष्टिक खायचे आहे? सकाळच्या नाश्त्याला बनवा वाफेवरील उपमा गोळे, सोपी आहे रेसिपी
ताज्या बातम्या

हेल्दी आणि पौष्टिक खायचे आहे? सकाळच्या नाश्त्याला बनवा वाफेवरील उपमा गोळे, सोपी आहे रेसिपी

breakfast recipe

Mini Steamed Upma Balls Recipe: सकाळच्या नाश्त्याला रोज काय वेगळं करावं असा प्रश्न पडतोय? मग काळजी करू नका! आजच ट्राय करा हे चविष्ट वाफेवरील उपमा गोळे. खूप सोपे, झटपट आणि हेल्दी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. मग वाट कसली पाहताय? याची रेसिपी लगेच लिहून घ्या.

सकाळच्या नाश्त्याला रोज काय वेगळं करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. नेहमीचे पोहे, उपमा, पराठे खाऊन कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी हलकं, पौष्टिक आणि झटपट बनवणारं पदार्थ मिळालं तर दिवसाची सुरुवातच छान होते. म्हणूनच आज आपण एक वेगळी आणि चविष्ट रेसिपी पाहणार आहोत वाफेवरील उपमा गोळे.

हेही वाचा: Ram Navami 2026: यंदा २६ की २७ मार्च रामनवमी कधी आहे? वाचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर खूप हेल्दी देखील आहे. कारण हा तळलेला नसून वाफेवर शिजवलेला आहे. त्यामुळे तेलाचा वापर खूप कमी होतो आणि पचनासाठीही हलका ठरतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ नक्कीच आवडतो.

साहित्य

रवा
मोहरी
जिरे
कडीपत्ता
हिरवी मिरची
कांदा
गाजर
मटार
मीठ
तेल
कोथिंबीर

 

कृती

सुरुवातीला कढईत पाणी गरम करा. त्यात मीठ घालून रवा टाका आणि हलक्या आचेवर उपमा तयार करून घ्या. उपमा थोडा गार झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करा.

नंतर दुसऱ्या कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. आता त्यात गाजर आणि मटार घालून थोडं शिजू द्या.

यानंतर तयार केलेले उपमाचे गोळे त्यात घाला आणि ८–१० मिनिटे मंद आचेवर हलक्या हाताने परतून घ्या.

सर्व्हिंग टिप

गरमागरम उपमा गोळे नारळाच्या चटणीसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts