Health Tips | आजकाल चुकीची जीवनशैली, अपुरी झोप आणि अयोग्य आहारा या गोष्टींमुळे अनेकांना सकाळी पोट साफ न होण्याची समस्या जाणवते. दिवसाची सुरुवातच जर अस्वस्थतेने झाली, तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. मात्र काही सोप्या सवयी आपल्या शरीराला लावल्या तर सकाळी नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आता सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करायला हवे, शरीराला कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत याबाबत जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – कलिंगडाच्या बिया फेकून देताय? थांबा! पुरुषांच्या आरोग्यासाठी ठरतात अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या खास फायदे
पोट साफ होण्यासाठी शरीराला कोणत्या सवयी लावल्या पाहिजेत?
1. कोमट पाणी प्या – सकाळी उठल्यानंतर दररोज एक ग्लास कोमट पाणी पिणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार, कोमट पाणी पिल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि अन्न पचन होण्यास मदत होते. त्यामुळे रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यामुळे पोट लगेत साफ होते.
2. ठरलेली वेळ पाळा – टॉयलेटला जाण्याची एक ठरावीक वेळ प्रत्येकाने पाळली पाहिजे. जर दररोज एकाच वेळेला टॉयलेटला जायची सवय लावली तर शरीराची नैसर्गिक सायकल तयार होते आणि दररोजच्या ठरावीक वेळेत तुमचे पोट साफ होण्यास मदत होते.
3. ताण-तणावात राहू नका – आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा,घरचा ताण प्रत्येकावर असतो. मात्र जास्त ताण-तणाव घेतल्यामुळे पचनक्रिया मंदावते. सारखे ताण-तणावात राहिले तर पोटात गॅस, पित्त, झळझळ, अपचन सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित पोट साफ होत नाही. तर ताण-तणाव जास्त घेऊ नका सकाळी उठल्यानंतर शरीर रिलॅक्स ठेवा यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते.
4. फायबरयुक्त पदार्थ खा – दररोज सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर फायबरयुक्त पदार्थ खा. यामध्ये ओट्स, पालेभाज्या, फळे, बिया या पदार्थांचा आहारात सामवेश करा. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि अन्न पचन होण्यास मदत होते.
5. जेवण झाल्यानंतर थोडं चालणे – दररोज रात्री जेवण केल्यानंतर थोडं चालणं गरजेचं आहे. चालण्याची सवय लावल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि सकाळी पोट लगेच साफ होते. त्यामुळे दररोज रात्री 5-10 मिनिटे चालण्याची सवय लावा.
सकाळी पोट साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे योग्य आहार, पुरेसे पाणी आणि नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. या साध्या सवयी रोजच्या जीवनात अंगीकारल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन दिवसाची सुरुवात सकारात्मक होऊ शकते.












