Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Eid Gifts for Kids: ईडी म्हणून मुलांना द्या हे खास भेटवस्तू, बच्चे कंपनी होतील खुश
Top News

Eid Gifts for Kids: ईडी म्हणून मुलांना द्या हे खास भेटवस्तू, बच्चे कंपनी होतील खुश

Eid Gift For kids

Eid Gifts for Kids: ईदच्या दिवशी मुलांना फक्त शगुन म्हणून पैसेच द्यावे असं काही नाही. तुम्ही हे खास गिफ्ट्स मुलांना देऊन त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणू शकता. वय कितीही असो, योग्य आणि उपयुक्त भेटवस्तू मुलांना मिळाली की मुलं नेहमी खुश राहतात. चला तर जाणून घेऊयात काही गिफ्ट आयडिया

ईद-उल-फितर, ज्याला ‘ईद’ म्हणूनही ओळखले जाते, हा रमजानच्या पवित्र महिन्यानंतर साजरा होणारा आनंदाचा दिवस आहे. लोक 29 किंवा 30 दिवस उपवास ठेवतात. त्यानंतर ईदचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी शगुन म्हणून ईदी देण्याची परंपरा आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवार घरी येतात, एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात आणि ईदी म्हणून पैसे किंवा भेटवस्तूची देवाण घेवाण होते. यंदा तुम्ही मुलांना काही खास भेट वस्तू देण्याचा विचार करत असाल, तर हे उपयुक्त देणारे गिफ्ट्स बेस्ट पर्याय आहे. पाहून मुलं खुश होतील.

हेही वाचा: summer Health Tips: उन्हाळ्यात सतत मुलांना ताप येतोय? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या कारणे आणि सोपे उपाय

ईदसाठी काही खास गिफ्ट आयडिया

कॅलिग्राफी किंवा पेंटिंग

ईदच्या निमित्ताने कॅलिग्राफी गिफ्ट म्हणून देऊ शकता, ज्यात कुराणाचे आयते किंवा इस्लामशी संबंधित सुंदर संदेश असतात. याशिवाय, रमजानच्या इबादती किंवा ईदच्या आनंदाचे चित्रण करणारी पेंटिंग देखील उपयुक्त ठरेल.

पुस्तके

जर तुमच्या कुटुंबातील कोणाला वाचनाची आवड असेल, तर या दिवशी पुस्तक भेट देणे सर्वोत्तम ठरेल.

तुम्ही मुलांना तुमच्या आवडीची पुस्तके देऊ शकता.

तुम्हाला आध्यात्मिक पुस्तके, मोटिवेशन मिळणारी पुस्तके भेट म्हणून देऊ शकता

मुलींसाठी
लहान मुलींना पर्स, मेकअप किट किंवा आवडत्या रंगाचा ड्रेस किंवा इतर वस्तू भेट देऊ शकतात.

मुलांसाठी
ईदच्या दिवशी मुलांसाठी जमेट्री बॉक्स किंवा फन ब्लास्ट सेट्स देऊ शकता. जसे कार, बसची आकाराची बॉक्स, लाइटसह.

अत्तर

मुलगा किंवा मुलगी, दोघांनाही सुगंधी भेटवस्तू आवडतात.

या दिवशी तुम्ही ईदच्या भेटवस्तूंऐवजी अत्तर देऊ शकता.

वेगवेगळ्या सुगंधांचे कॉम्बो सेट देखील एक उत्तम पर्याय आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts